Turmeric Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Turmeric Cultivation : सेलमसह ३८ ते ४० वाणांची होणार लागवड

Turmeric Farming : हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या प्रक्षेत्रावर यंदाच्या हंगामातील हळद लागवडीस शनिवारी (ता. ८) सुरुवात करण्यात आली.

Team Agrowon

Hingoli News : हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राच्या प्रक्षेत्रावर यंदाच्या हंगामातील हळद लागवडीस शनिवारी (ता. ८) सुरुवात करण्यात आली. यंदा हळदीच्या सेलम या वाणासह इतर ३८ ते ४० वाणांची प्रक्षेत्रावर लागवड करण्यात येणार आहे.

केंद्राचे संचालक व हळद प्रक्रिया उद्योजक लक्ष्मीनारायण मुरक्या, मन्मथ सिद्धेवार, शिवाजीराव काकडे, तंत्र अधिकारी रमेश देशमुख‌, नितीन देशपांडे आदींसह शेतकरी उपस्थित होते. केंद्राच्या प्रक्षेत्रावर या वर्षी शेततळ्यामध्ये पाणीसाठा आहे. सिंचनासाठी पाणी असल्यामुळे यंदा गत वर्षीच्या तुलनेत लवकर हळद लागवडीस प्रारंभ करण्यात आला आहे.

या भागात सेलम या वाणाला चांगली मागणी असल्यामुळे या वर्षी सेलम वाणाची लागवड मोठ्या प्रमाणावर होत असून, या वाणाबरोबरच इतर ३८ ते ४० वाणांची लागवड करण्यात येणार आहे. हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील, लातूर विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या वर्षीप्रमाणेच पुढील वर्षीही परिसरासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिशय दर्जेदार बेणे उपलब्ध व्हावे यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

हळद लागवड अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्यात आली असून या संपूर्ण बेण्याला रासायनिक घटकांची प्रक्रिया करण्यात आली. लागवडीच्या दिवशी बायोमिक्स जैविक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करून लागवड करण्यात येत आहे. एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करण्यात आले असून, हळदीचे चांगले उत्पादन मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सर्व तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे, असे तंत्र अधिकारी रमेश देशमुख‌ यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT