Agriculture Crisis Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Crisis : अमरावतीतील ३८ महसूल मंडले ‘रेड झोन’

Resowing Crisis : ९१ मंडलांपैकी ३८ मंडलांत ७५ टक्क्यांच्या आत पाऊस पडला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत पाऊस बरसला नाही तर दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.

Team Agrowon

Amravati News : अमरावती जिल्ह्यात आतापर्यंत झालेला पाऊस सार्वत्रिक स्वरूपाचा नसल्याने काही महसूल मंडलांत अद्यापही ७५ टक्के पाऊस झालेला नाही. ९१ मंडलांपैकी ३८ मंडलांत ७५ टक्क्यांच्या आत पाऊस पडला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत पाऊस बरसला नाही तर दुबार पेरणीचे संकट येण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.

जिल्ह्यात यंदा हवामानाचे सर्वच अंदाज चुकल्याची परिस्थिती पाहावयास मिळत आहे. मागील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार पावसाची शक्यता वर्तविली जात असताना काही भागात मात्र मोठ्या प्रमाणात पाऊस बरसला आहे. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी जोखीम घेत पेरणी केल्याचे वास्तव आहे. सद्यःस्थितीत पावसाची टक्केवारी ९० टक्के असून पेरण्यांची टक्केवारी ३१ आहे. जिल्ह्यातील ३८ महसूल मंडलांत ७५ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस बरसला आहे.

यातही १६ मंडलांत ५० टक्क्यांच्या पेक्षा कमी, तर ८ मंडलांत ४० ते २० टक्केच पाऊस झाला आहे. अशा परिस्थितीत पेरणी कशी होईल, असाही प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. ३२ महसूल मंडलांत शंभर टक्क्यांवर पाऊस बरसला आहे. त्यामुळे याठिकाणी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पेरण्या केल्या आहेत. काही ठिकाणी ७० ते ७५ टक्के पाऊस असताना अशाही शेतकऱ्यांनी पावसाच्या आशेवर पेरण्या आटोपल्या आहेत. त्यामुळे या भागात जर

येत्या दोन ते तीन दिवसांत पाऊस बरसला नाही तर त्यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओडविण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांमध्ये धडकी भरली आहे.

तालुके डेंजर झोनमध्ये तालुकानिहाय पावसाची आकडेवारी पाहिली असता धारणी, अमरावती, भातकुली, तिवसा, मोर्शी आणि अचलपूर या तालुक्यांमध्ये ७२ टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा अद्यापही कायम आहे. त्याचवेळी नांदगाव खंडेश्वर, चांदूररेल्वे, दर्यापूर, अंजनगावसुर्जी आणि चांदूरबाजार या पाच तालुक्यांत शंभर टक्क्यांवर पाऊस झाला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Jayakwadi Dam : जायकवाडीतून रब्बी, उन्हाळी हंगाम आवर्तने

MVA Manifesto : मविआच्या महाराष्ट्रनामात पाच गॅरंटी; शेतकऱ्यांसाठी गुलाबी क्रांती योजना अन् कर्जमाफी

Rabi Sowing : मराठवाड्यात ६ लाख ८१ हजार हेक्टरवर रब्बी पेरणी

Dhananjay Mahadik : 'लाडकी बहीण'वरून दम देण्याऱ्या महाडिक यांच्याकडून दिलगिरी; त्यात ही वोट जिहादचा उल्लेख

Book Review : उलगडले मधमाशीचे आश्‍चर्यकारक विश्‍व

SCROLL FOR NEXT