Grape Farmer Fraud Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Framer Fraud : परप्रांतीयांकडून द्राक्ष उत्पादकांना ३६ लाखांना गंडा

Grape Farmer : चांदवड तालुक्यातील धोडांबे, वडनेरभैरव, विजयनगर, बहादुरी, वडाळीभोई येथील १२ ते १३ द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना परराज्यातील तीन व्यापाऱ्यांनी सुमारे ३६ लाख रुपयांना गंडा घातला.

Team Agrowon

Nashik News : चांदवड तालुक्यातील धोडांबे, वडनेरभैरव, विजयनगर, बहादुरी, वडाळीभोई येथील १२ ते १३ द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना परराज्यातील तीन व्यापाऱ्यांनी सुमारे ३६ लाख रुपयांना गंडा घातला. या प्रकरणी विजयनगर येथील अभिमान केदू काळे (४१) यांनी वडनेरभैरव पोलिसात फिर्याद दिल्याने तिन्ही परप्रांतीय व्यापाऱ्यांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील विजयनगर येथील अभिमान काळे या शेतकऱ्याचे लोकंद्र सिंह, दिवाण सिंह, सुनील सिंह (तिघे रा. फत्तेपूर सिक्री, हसनपुरा, आग्रा) यांनी ३१ किलो रुपये दराने ११६.५० क्विंटल द्राक्ष ४ लाख १६ हजार रुपयांना खरेदी केले होते.

त्यापैकी २ लाख १६ हजार रुपये काळे यांना देण्यात आले. उर्वरित २ लाख रुपये देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे काळे यांच्या लक्षात येताच त्यांनी तिन्ही परप्रांतीय व्यापाऱ्यांविरोधात वडनेरभैरव पोलिसांत फिर्याद दिली आहे.

या व्यापाऱ्यांनी धोडांबे येथील विजय रकिबे (२ लाख २० हजार), शिंदे येथील महेंद्र काळे (३ लाख), चंद्रकांत गवळी (४ लाख ५० हजार), वडाळीभोई येथील बाबाजी जाधव (६८ हजार), दीपक भास्कर जाधव (५२ हजार), वडनेरभैरव येथील जगन्नाथ कारभारी पाचोरकर (५ लाख ७८ हजार ५४४),

भीमाशंकर जंगम (३ लाख ८५ हजार), शशिकांत भालेराव(२.५ लाख), चिंधू भालेराव(२ लाख), विजय नगर येथील हरिदास काळे (४ लाख ६० हजार), किरण काळे (१२ लाख पाच हजार) तर बहादुरी येथील कृष्णा शिरसाठ (७ लाख ८४ हजार) व चंद्रभान शिरसाठ (१ लाख ७१ हजार) अशी एकूण ३६ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT