Bidri Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane FRP : कागलच्या बिद्री काखान्याचा ३४०७ रुपये ऊसदर जाहीर

Bidri Sugar Factory : बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने यंदा गाळप होणाऱ्या उसासाठी प्रति टन ३४०७ रुपये इतका दर जाहीर केला आहे.

Team Agrowon

Kolhapur News : बिद्री (ता. कागल) येथील श्री दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने यंदा गाळप होणाऱ्या उसासाठी प्रति टन ३४०७ रुपये इतका दर जाहीर केला आहे. अध्‍यक्ष के. पी. पाटील यांनी शुक्रवारी (ता. १५) याबाबतची घोषणा केली.

कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत माजी अध्यक्ष के. पी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी महालक्ष्मी शेतकरी विकास आघाडीच्या सर्व २५ उमेदवारांनी विजय मिळवला. नवीन संचालक मंडळाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड झाली.

याच सभेत सलग चार वेळा अध्यक्षपद भूषविणारे माजी आमदार के. पी. पाटील यांची अध्यक्षपदी फेरनिवड झाली. याच बैठकीत श्री पाटील यांनी ऊस दराची घोषणा केली. त्यांनी ‘बिद्री’ने दिलेला ऊसदर महाराष्ट्रातील इतर कोणत्याही कारखान्यापेक्षा जास्त असल्याचा दावा केला.

ते म्हणाले की, ‘एफआरपी’नुसार बिद्री कारखान्याचा उसाचा दर प्रतिटन ३२०० रुपये होतो. अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ३२०० रुपये जमा करण्यात आले आहेत.

मात्र, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेऊन नवनिर्वाचित संचालक मंडळाने प्रति टन ३४०७ रुपये दर देण्याचा निर्णय आहे. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात अगोदरच ३२०० रुपये जमा झाले आहेत, त्यांना २०७ रुपयांचा दुसरा हप्ता हंगाम संपताना दिला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Protest: आंबा, काजू उत्पादकांचा मोर्चा मुंबईत रोखला, राजू शेट्टी, महादेव जानकरांची पोलिसांकडून धरपकड

Agrowon Podcast: सोयाबीनमध्ये चढ उतार; कापूस टिकून, मक्याचा भाव दबावातच, बाजरी आवकेचा दबाव, तूर स्थिरावली

Illegal Water Lifting: अवैध पाणी उपसा; तलावांवरील मोटारी हटविण्याचे आदेश

Lower Terna Project: निम्न तेरणा प्रकल्पाचा कारभार वाऱ्यावर

Land Acquisition: शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचा निधी तातडीने द्या : मंत्री प्रकाश आबिटकर

SCROLL FOR NEXT