Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : विमा कंपनीला ३२१ कोटी, शेतकऱ्यांना फक्त १०५ कोटी

Crop Insurance Scheme : ‘एक रुपयात पीकविमा’अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील सात लाख एक हजार ६४० शेतकऱ्यांनी खरीप हंगामात विमा उतरविला.

Team Agrowon

Solapur News : ‘एक रुपयात पीकविमा’अंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील सात लाख एक हजार ६४० शेतकऱ्यांनी खरीप हंगामात विमा उतरविला. जिल्ह्यासाठी विमा कंपनीला राज्य सरकारकडून १८८ कोटी ४१ लाख रुपये तर केंद्राकडून १३२ कोटी ८१ लाख रुपयांचा हिस्सा मिळाला.

तर दुसरीकडे शेतकऱ्यांचा प्रत्येकी एक रुपया, असे एकूण ३२१ कोटी २९ लाख रुपये विमा कंपनीला मिळाले. मात्र, त्यापैकी अवघे १०५ कोटी रुपयेच शेतकऱ्यांच्या पदरात पडले असून उर्वरित २१६ कोटी रुपयांमधील एक दमडीही अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही.

पावसाळ्यात पावसाचा मोठा खंड पडल्याने अनेक पिकांचे नुकसान झाले. त्यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढलेल्या अधिसूचनेनुसार विमा कंपनीने जिल्ह्यातील बाधित एक लाख ७० हजार ९४५ शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रिम दिला. आतापर्यंत विमा कंपनीने शेतकऱ्यांना पिकांच्या भरपाईपोटी १०५ कोटी रुपयांची भरपाई वितरित केली आहे.

पण, अद्याप तूर, कांदा, भुईमूग, कापूस या पिकांसाठी विमा कंपनीकडून भरपाई मिळालेली नाही. या पिकांना भरपाई द्यायची की नाही, हा विषय कृषी आयुक्तांपासून मंत्री आणि पुढे केंद्र सरकारपर्यंत पोचला.

त्याठिकाणी शेतकऱ्यांना भरपाई देण्यासंदर्भातील आदेश झाले, पण अद्याप शेतकऱ्यांना पीकविम्याची प्रतीक्षाच आहे. जिल्ह्यात सध्या दुष्काळी स्थिती असतानाही सर्व बाधित शेतकऱ्यांना ना दुष्काळातील भरपाई मदत ना पीकविम्याचे पैसे, अशीच स्थिती पाहायला मिळत आहे.

नुकसानीचे पंचनामे अन्‌ पीक कापणीनंतरही भरपाईची प्रतीक्षाच

अतिवृष्टी व पावसाचा खंड, यामुळे शेती पिकांचे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील जवळपास ८० हजार शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे त्यासंबंधीची पूर्वसूचना दिली होती. त्यांच्या नुकसानीचे पंचनामे होऊन आता सहा-सात महिने झाले आहेत. दुसरीकडे खरीप पिकांच्या नुकसानीची वस्तुनिष्ठ आकडेवारी पीक कापणी प्रयोगानंतर मिळते. त्यामुळे पीक कापणी प्रयोग देखील झाले, पण अद्याप या शेतकऱ्यांना भरपाई काहीही मिळालेली नाही.

पीकविम्याची जिल्ह्यातील स्थिती

पीकविमा भरलेले शेतकरी

७,०१,६४०

राज्य सरकारचा हिस्सा

१८८.४१ कोटी

केंद्र सरकारचा हिस्सा

१३२.८१ कोटी

विमा कंपनीकडील एकूण रक्कम

३२१.२९ कोटी

शेतकऱ्यांना मिळालेली भरपाई

१०५ कोटी

भरपाई मिळालेले शेतकरी

१,७०,९४५

खरीप हंगामात शेती पिकांचा विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, यासाठी विमा कंपनीकडे पाठपुरावा सुरु आहे. नुकसानीची पूर्वसूचना दिलेले शेतकरी व पीक कापणी प्रयोगानंतर ज्यांचे नुकसान झाले, त्या शेतकऱ्यांना भरपाई अपेक्षित आहे.
- दत्तात्रय गवसाने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT