Tree Plantation Agrowon
ॲग्रो विशेष

Tree Plantation: माळरानावर लावणार ३० हजार देशी वृक्ष

Tree Foundation: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी व धामणी या दुष्काळी गावात १४ ट्री फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून एकूण सुमारे १५० एकर माळरानावर ३० हजार देशी वृक्ष लागवड करून त्यांचे पाच वर्षांपर्यंत संस्था संगोपन करणार आहे.

Team Agrowon

Pune News: आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी व धामणी या दुष्काळी गावात १४ ट्री फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून एकूण सुमारे १५० एकर माळरानावर ३० हजार देशी वृक्ष लागवड करून त्यांचे पाच वर्षांपर्यंत संस्था संगोपन करणार आहे. पहिल्या टप्प्यात दोन्ही गावांत प्रत्येकी पाच हजार वृक्ष लागवड करण्यात आली आहे. आठवड्यातून एकदा प्रत्येक झाडाला पाइपने पाणी दिले जात आहे.

१४ ट्री फाउंडेशन (वेताळे, ता. खेड) या संस्थेचे व्यवस्थापक अनंत तायडे लोणी व धामणी या दोन गावांतील वृक्ष लागवड मोहिमेबद्दल माहिती देताना म्हणाले, की संस्थेच्या वतीने आम्ही खड्डे घेऊन वड, पिंपळ, चिंच, आवळा, जांभुळ, कडूलिंब आदी देशी वृक्षांची लागवड करतो प्रत्येक झाडाला जिवामृत खते दिली जातात.

टंचाईच्या काळात उंच ठिकाणी तळे करून टँकरने पाणी आणून त्यामध्ये साठवून वीज, पेट्रोल किंवा सोलर पंपाच्या साह्याने पाइपने प्रत्येक झाडाला आठवड्यातून एकदा पाणी दिले जाते. प्रत्येक झाडाला नंबर दिला आहे त्यांच्या नोंदी ठेवल्या जातात. एखादे झाड मेले तर तीन वर्षांपर्यंत पुन्हा त्या ठिकाणी नवीन झाडाची लागवड केली जाते. पाच वर्षांपर्यंत संस्था झाडांचे संगोपन करते.

यासाठी स्थानिक १६ तरुणांना रोजगार मिळाला आहे. झाडांचे जनावरांपासून संरक्षण होण्यासाठी संपूर्ण क्षेत्राला बांबूपासून कठडे बसवले आहे. लोणीत काही ठिकाणी वीज उपलब्ध नसल्याने दोन ठिकाणी सोलर वरील पंप बसवले आहे स्थानिक नागरिकांना निसर्गाबाबत आपुलकी निर्माण व्हावी त्यांचा या मोहिमेत सहभाग वाढवा यासाठी उंच ठिकाणी बसण्यासाठी गवताच्या झोपड्या तयार करण्यात आल्या आहेत.

लोणी येथे माजी विद्यार्थी विकास प्रबोधनी, शालेय विद्यार्थी, ग्रामपंचायत व धामणी येथे ग्रामपंचायत व विद्यार्थ्यांचे वृक्ष लागवड करण्यासाठी सहकार्य मिळाल्याचे श्री. तायडे यांनी सांगितले.लोणी येथे एकूण १२५ एकरांवर २५ हजार वृक्ष लावण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात पाच हजार वृक्ष लागवड केली आहे. धामणी येथे २५ एकर वर पाच हजार वृक्ष लावण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Sowing: कपाशीची ८ हजार ६७१ हेक्टर लागवड उगवण संकटात

Kharif Sowing Issues: पुसद तालुक्यात ७० हजार हेक्टरवरील पेरण्या रखडल्या

Vidarbha Water Crisis: विदर्भावर जलसंकटाचे सावट

Ahilyanagar Politics: पंचवीस टक्के ताकद वापरली तरी आमदार पाडू शकतो

Sugarcane Price: विलास साखर कारखान्याकडून उसाला ३,१७१ रुपये दर

SCROLL FOR NEXT