Tur Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Procurement: तूर खरेदी नोंदणीस ३० दिवसांची मुदतवाढ!

Tur Registration Extension: राज्यात तूर खरेदी नोंदणीस अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने सरकारने ३० दिवसांची मुदतवाढ दिली आहे. आतापर्यंत केवळ २९ हजार २५४ शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून, १६१ शेतकऱ्यांकडून १८१३ क्विंटल तूर खरेदी झाली आहे.

बाळासाहेब पाटील

Mumbai News: राज्यातील शेतकऱ्यांची तूर हमीभावाने खरेदी करण्यासाठी २४ जानेवारीपासून सुरू असलेल्या नोंदणीला ३० दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. २ लाख ९७ हजार टन तूर खरेदीचे उद्दिष्ट असून आजअखेर केवळ २९ हजार २५४ शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे.

राज्यात यंदा हमीभावाने तूर खरेदी करण्यात येणार आहे. या खरेदीसाठी राज्यात ३०० खरेदी केंद्रांवर तूर खरेदी करण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात नोंदणीला अल्प प्रतिसाद मिळाल्याने अपेक्षित खरेदी होण्याची चिन्हे नाहीत.

परिणामी एक महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. २५ जानेवारीअखेर राज्यात २९ हजार, २५४ शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून १६१ शेतकऱ्यांकडून १८१३.८६ क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. उर्वरित शेतकऱ्यांना नोंदणी करता यावी यादृष्टीने ही मुदतवाढ देण्यात आल्याचे पणनमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.

सोयाबीन खरेदीमध्ये नाफेड आणि एनसीसीएफच्या घोळामुळे मोठा गोंधळ उडाला होता. शेतकऱ्यांचे सोयाबीन वेळेत खरेदी न केल्याने नुकसान सहन करावे लागले होते.

तसेच वेअर हाउसिंग कार्पोरेशनने खरेदी केलेल्या मालाचे पैसे वेळेत न दिल्याने शेतकऱ्यांच्या प्रचंड तक्रारी होत्या. खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांना सुविधा द्यावी तसेच तक्रार निवारण केंद्रांची स्थापना करावी अशी सूचनाही मंत्री रावल यांनी याआधीच्या बैठकीत दिली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chana Market Rate: सध्या हरभऱ्याचा भाव हमीभावापेक्षा ८०० ते ११०० रुपयांपेक्षा कमी

Irrigation Management: सिंचन व्यवस्थापन अराजकतेच्या वळणावर

Smart Farming: पपई- मिरची- खरबूज पद्धतीतून उत्पन्नाचा हुकमी स्रोत

Dairy Farming Success Story: दुग्ध व्यवसाय हेच झाले माझे विश्‍व

Fertilizer Subsidy: खत अनुदान थेट शेतकऱ्यांना देणे शक्य; डीबीटी यंत्रणा उभारण्याच्या कृषिमंत्र्यांच्या सूचना

SCROLL FOR NEXT