Agricultural Mechanization Agrowon
ॲग्रो विशेष

Tractor Implements Subsidy : ट्रॅक्टरचलित अवजारांचे ३ कोटी ७६ लाखांवर अनुदान रखडले

Agricultural Mechanization : कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत २०२२-२३ अंतर्गत परभणी ६३९ लाभार्थी शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित अवजारांचे मिळून एकूण ३ कोटी ७६ लाख ४ हजार रुपये अनुदान वितरण मागील ८ महिन्यांपासून रखडले आहे.

Team Agrowon

Parbhani News : कृषी यांत्रिकीकरण अंतर्गत २०२२-२३ अंतर्गत परभणी ६३९ लाभार्थी शेतकऱ्यांचे ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित अवजारांचे मिळून एकूण ३ कोटी ७६ लाख ४ हजार रुपये अनुदान वितरण मागील ८ महिन्यांपासून रखडले आहे. महाडीबीटी पोर्टलवर कृषी यांत्रिकीकरणअंतर्गत नवीन अर्जाची प्रक्रिया ठप्प आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत.

कृषी विभाग अंतर्गत कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत २०२२ -२३ या आर्थिक वर्षात महाडीबीटी पोर्टलवर परभणी जिल्ह्यातील ३ हजार ७५७ लाभार्थी शेतकऱ्यांना विविध अवजारांसाठी २१ कोटी ७६ लाख ७ हजार रुपये अनुदान वितरित करण्यात आले आहे.

त्यात ३१ कंबाइन हार्वेस्टरबद्दल २ कोटी ५२ लाख ७८ हजार रुपये, एकूण ५७५ ट्रॅक्टरबद्दल ७ कोटी १८ लाख रुपये, इतर ३ हजार १५१ अवजारांचे ११ कोटी ९१ लाख रुपये एवढ्या अनुदानाचा समावेश आहे.

परंतु ट्रॅक्टर, ट्रॅक्टरचलित अवजारे, स्वयंचलित यंत्र, कंबाइन हार्वेस्टर यासह अन्य अवजारांचे मिळून एकूण ६३९ शेतकऱ्यांचे ३ कोटी ७६ लाख ४ लाख रुपये अनुदान अद्याप प्रलंबित आहे. महाडीबीटी पोर्टलवर यांत्रिकीकरण अंतर्गत नवीन अर्ज तसेच लाभार्थीची सोडत काढण्याची प्रक्रिया ठप्प आहे. प्रलंबित अनुदान अदा करावे. नवीन अर्जाची प्रक्रिया तत्काळ सुरू करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

कृषी यांत्रिकीकरण अनुदान प्रलंबित स्थिती (अनुदान रक्कम लाख रुपये)

तालुका लाभार्थी संख्या अनुदान रक्कम

परभणी १०३ ८२.८९

जिंतूर १०२ ६७.७४

सेलू ७४ ३३.२३

मानवत ५२ ३१.३०

पाथरी ४४ ३३.२१

सोनपेठ ३९ १७.४४

गंगाखेड ५१ ३३.२४

पालम ८९ ४१.०३

पूर्णा ८५ ३५.९६

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cabbage Farming: कोबी पिकात आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब

Brazil Agricultural Cooperation: ब्राझीलसोबत कृषी क्षेत्रामध्ये सहकार्य संधी

Onion MSP Demand: कांद्याला तातडीने प्रतिक्विंटल २ हजार हमीभाव, १,५०० रुपये अनुदान देण्याची मागणी

Akola Heatwave: अकोला जिल्ह्यात अति उष्णतेमुळे होरपळ

Mini kit Seeds Application: मिनीकिट बियाण्यांसाठी अर्जाचा आज शेवटचा दिवस

SCROLL FOR NEXT