Sugar Factory Agrowon
ॲग्रो विशेष

Sugar Factory : सोलापूरातील सात कारखान्यांना मिळणार २.८२ कोटींचे व्याज अनुदान

Sugar Factory Subsidy : सोलापूर जिल्ह्यातील सात कारखान्यांना २.८२ कोटी रुपयांचे व्याज अनुदान मिळणार आहे.

Team Agrowon

Solapur News : राज्यातील २०१४-१५ मध्ये गाळप हंगाम घेतलेल्या साखर कारखान्यांना शेतकऱ्यांची एफआरपी अदा करण्यासाठी सॉफ्ट लोन-२०१५ योजनेअंतर्गत २०१७-१८ ते २०२०-२१ या चार वर्षांसाठी ३८.५२ कोटी रुपये व्याज अनुदानाचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील सात कारखान्यांना २.८२ कोटी रुपयांचे व्याज अनुदान मिळणार आहे.

गाळप हंगाम २०१४-१५ मध्ये कारखान्यांना ऊस पुरविणाऱ्या शेतकऱ्यांना उसाची एफआरपी रक्कम देण्याकरिता मदत व्हावी, यासाठी केंद्र सरकारने २३ जून २०१५ च्या अधिसूचनेनुसार सॉफ्ट लोन योजना जाहीर केली होती. त्यास अनुलक्षून गाळप हंगाम २०१५ मधील एफआरपीप्रमाणे देय ऊस किमतीच्या ५० टक्के रक्कम ३० जून २०१५ अखेर ज्या कारखान्यांनी अदा केलेली आहे,

अशा राज्यातील १४८ पात्र सहकारी व खासगी कारखान्यांना केंद्र सरकारने जाहीर केलेली योजना लागू करण्याबाबत तसेच प्रथम वर्षाच्या कर्जावरील सरळव्याज १० टक्के किंवा बँकांकडून आकारण्यात येणारे व्याजदर यामधील जो दर कमी असेल,

त्यातून प्रथम वर्षाचे अनुदान केंद्र सरकारने दिल्यावर उर्वरित कर्जावरील पुढील चार वर्षाचे व्याज अनुदान राज्य सरकार देईल, असा निर्णय ३० जुलै २०१५ च्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला होता. त्यानुसार २०२२-२३ च्या वित्तीय वर्षात या योजनेअंतर्गत ७१ कारखान्यांना ५१.४५ कोटी इतकी रक्कम अनुदानापोटी वितरित करण्यात आली.

या कारखान्यांना मिळणार व्याज अनुदान (लाखांत)

विठ्ठलराव शिंदे, पिंपळनेर (माढा) ५२.३०

पांडुरंग, श्रीपूर

(ता. माळशिरस) ५७.८७

सिद्धेश्‍वर सहकारी साखर कारखाना (सोलापूर) ४६.९३

सहकार शिरोमणी

(भाळवणी, ता. पंढरपूर) २४.८९

विठ्ठल सहकारी साखर कारखाना

(गुरसाळे, ता. पंढरपूर) ४१.१५

मकाई साखर कारखाना (करमाळा) ११.५३

सहकार महर्षी साखर कारखाना (अकलूज) ४७.३३

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT