Voter List Agrowon
ॲग्रो विशेष

Loksabha Election : मतदार यादीतील २७ हजार नावे वगळली

Election Voter List : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून मतदारयाद्या अद्ययावत करण्यात येत आहे.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा निवडणूक शाखेकडून मतदारयाद्या अद्ययावत करण्यात येत आहे. जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघनिहाय एक लाख ४२ हजार ३४९ दुबार आणि समान छायाचित्र असलेल्या मतदारांपैकी केवळ २७ हजार ९१२ नावे वगळण्यात आली आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार २२ जानेवारी रोजी अंतिम मतदारयादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. भारतीय लोकप्रतिनिधित्व अधिनियम १९५०च्या कलम १७ आणि १८ नुसार एका मतदाराची मतदारयादीमध्ये एकच नोंद असणे आवश्यक आहे.

या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक शाखेने प्रारूप यादी प्रसिद्ध केल्यानंतर त्यावरील सूचना आणि हरकती नोंदविण्यासाठी वेळ देऊन मतदार याद्या अद्ययावतीकरण मोहीम राबविण्यात येत आहे.

मतदाराचे नाव एकापेक्षा जास्त ठिकाणी असणे, अधिक ठिकाणी समान छायाचित्र आणि एकापेक्षा जास्त ठिकाणी मतदारांच्या इतर माहितीमध्ये साधर्म्य आढळलेल्या किंवा दुबार नावनोंदणी आढळलेल्या मतदारांना नमुना ‘अ’मध्ये नोटीस पाठवून १२ जानेवारीपर्यंत दुरुस्ती करून घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.

‘ज्या व्यक्ती स्थानिक पत्त्यांवर आढळून आल्या नाहीत, त्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून कोणत्याही एका ठिकाणी नाव ठेवण्याबाबत चौकशी करून नावे वगळण्याची प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार दुबार; तसेच समान छायाचित्र असणारी २७ हजार ९१२ नावे वगळण्यात आली आहेत,’ अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर यांनी दिली.

मतदारयाद्या अद्ययावतीकरणाची प्रक्रिया सुरू असताना अनेक ठिकाणी दुबार नावे असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या झाल्या. संबंधितांशी संपर्क साधूनही प्रतिसाद न मिळाल्यास नाव न वगळता अशा मतदारांची विशेष यादी तयार करून मतदान केंद्रांवरील अधिकाऱ्यांकडे देण्यात येते. त्यानुसार संबंधित मतदाराला एकदाच मतदान करण्याचा अधिकार दिला जाईल.
- मीनल कळसकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT