PM Surya Ghar Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

PM Surya Ghar Yojana : अमरावतीत २७ कोटींचे अनुदान ग्राहकांच्या खात्यात

Suryaghar Yojana Subsidy : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला अमरावती जिल्हात उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील एकूण ४ हजार ६२९ वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्या कडील प्रकल्पाची एकूण स्थापित क्षमता १९.७४ मेगावॉट आहे.

Team Agrowon

Amravati News : प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेला अमरावती जिल्हात उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील एकूण ४ हजार ६२९ वीज ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला असून त्यांच्या कडील प्रकल्पाची एकूण स्थापित क्षमता १९.७४ मेगावॉट आहे.

अठ्ठ्याहत्तर हजारांपर्यंत अनुदान असलेल्या या योजनेत जिल्ह्यातील लाभार्थ्यांना ३३ कोटी १० लाखाचे अनुदान मंजूर झाले आहे, त्यापैकी ३ हजार ५५२ लाभार्थ्यांच्या बँक खात्यात २७ कोटी ५० लाखाचे अनुदान जमा झाले असून, उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात हे अनुदान वळते करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

महिना तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळावे यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेल्या या योजनेत अमरावतीने आघाडी घेतली आहे.

या योजनेत केंद्र सरकारकडून छतावरील सौर ऊर्जा निर्मितीचे रूफ टॉप सोलर प्रकल्प बसविणाऱ्या वीज ग्राहकांना एक किलोवॉट क्षमतेच्या प्रकल्पाला ३० हजार रुपये, दोन किलोवॉट क्षमतेच्या प्रकल्पाला ६० हजार रुपये व तीन किलोवॉट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या प्रकल्पाला ७८ हजार रुपये अनुदान मिळते.

एक किलोवॉटच्या सौर यंत्रणेतून दरमहा सुमारे १२० युनिट वीज तयार होते. गरजेपेक्षा जास्त वीज तयार झाल्यामुळे वीज बिल शून्य होते तसेच अतिरिक्त वीज महावितरणला विकता येते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT