Plane Crash Agrowon
ॲग्रो विशेष

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद येथे विमान अपघातात २४२ प्रवाशांचा मृत्यू

Plane Crash 2025: अहमदाबाद येथील विमानतळावरून लंडनच्या दिशेने झेपावलेले एअर इंडिया कंपनीचे ‘७८७-ड्रीमलायनर’ (एआय १७१) हे विमान गुरुवारी (ता. १२) दुपारी उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये कोसळून झालेल्या भीषण अपघातामध्ये २४२ प्रवाशांचा मृत्यू झाला.

Team Agrowon

Ahmedabad News: अहमदाबाद येथील विमानतळावरून लंडनच्या दिशेने झेपावलेले एअर इंडिया कंपनीचे ‘७८७-ड्रीमलायनर’ (एआय १७१) हे विमान गुरुवारी (ता. १२) दुपारी उड्डाणानंतर अवघ्या काही मिनिटांमध्ये कोसळून झालेल्या भीषण अपघातामध्ये २४२ प्रवाशांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये विमानातील कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. याच विमानातून गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे देखील प्रवास करत होते.

भाजपचे ज्येष्ठ नेते भूपेंद्रसिंह चुडासामा यांनी माध्यमांशी बोलताना याला दुजोरा दिला. या अपघातामुळे अवघा देश हळहळला. या अपघाताची तीव्रताच एवढी भीषण होती की विमानातील प्रवाशी जागीच खाक झाले. या दुर्घटनेनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह परदेशातील नेत्यांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

या विमानाने उड्डाण करताच त्याला अपेक्षित उंची गाठता न आल्याने ते कोसळले. काही क्षणांमध्ये त्याने पेट घेतल्याने त्याचा भीषण स्फोट झाला. सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाला लागून असलेल्या मेघानीनगर भागामध्ये दुपारी दोनच्या सुमारास हे विमान कोसळले. या दुर्घटनेनंतर हवाई वाहतूक तातडीने थांबविण्यात आली.

अपघातग्रस्त विमानात १६९ भारतीय, ५३ ब्रिटिश नागरिक आणि एक कॅनेडियन नागरिक प्रवास करत होता. या अपघातातील गंभीर जखमींना उपचारासाठी तातडीने स्थानिक रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या अपघाताचे वृत्त कळताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत जखमींना तातडीने मदत करण्याची सूचना केली.

‘एअर इंडिया’चे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी आपत्कालीन केंद्र स्थापन करण्यात आले असून प्रवाशांच्या कुटुंबीयांकडून माहिती घेण्यासाठी काही वेगळी पथके नेमण्यात आल्याची घोषणा केली आहे.

जिवितहानी

भारतीय -१६९
ब्रिटिश - ५३
कॅनेडियन -१
पोर्तुगीज -७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mukhyamantri Sahayata Nidhi: मुख्यमंत्री साह्यतामधून नाशिक विभागात ३५४२ रुग्णांना साडेबत्तीस कोटींची मदत  

Crop Insurance: अमरावती जिल्ह्यात केवळ २३ टक्के क्षेत्र विमासंरक्षित

Farmer Scam: कर्मचाऱ्याने लाभार्थ्यांचे २३ लाख लुबाडले

SMART Project: ‘स्मार्ट’अंतर्गत १६ ‘एफपीओं’ना १०.५३ कोटींचे अनुदान वितरित

Nanded Weather: नांदेडसाठी पुन्हा ‘येलो अलर्ट’ जारी

SCROLL FOR NEXT