Orchard Agrowon
ॲग्रो विशेष

Backyard Development : राज्यातील २४ हजार ७४१ परसबागा विकसित

PM Poshan Shakti Scheme : पंतप्रधान पोषणशक्ती - निर्माण योजनेअंतर्गत सन २०२३-२४ करिता राज्यातील एकूण ४६ हजार ९४६ शाळांमधून परसबाग निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : पंतप्रधान पोषणशक्ती - निर्माण योजनेअंतर्गत सन २०२३-२४ करिता राज्यातील एकूण ४६ हजार ९४६ शाळांमधून परसबाग निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी २४ हजार ७४१ शाळांमधून परसबागा विकसित करण्यात आलेल्या आहेत.

उत्कृष्ट परसबाग स्पर्धेचे परीक्षण मार्चअखेर पूर्ण करण्यात आले आहे. या परसबागेतील उत्पादित भाजीपाल्याचा समावेश नियमितपणे आहारामध्ये करण्यात येत आहे.

कृषी विभाग, कृषी विद्यापीठे तसेच कृषी विज्ञान केंद्र व इतर एन.जी.ओ यांच्या मदतीने जिल्ह्यातील योजनेस पात्र सर्व शाळांमधून परसबागांची उभारणी होण्याच्या दृष्टिने पुढाकार घेऊन जिल्ह्यातील सर्व शाळांमधून उत्कृष्ट परसबाग ही संकल्पना एक चळवळ म्हणून राबविण्यात येत आहे.

काही शाळांमधून विशेषतः नागरी भागामध्ये जागेची मर्यादा लक्षात घेता अशा ठिकाणी शाळांच्या छतावर परसबाग उभारणी करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. अधिकाधिक शाळांनी परसबागा विकसित कराव्यात यासाठी शाळांना प्रोत्साहन देण्याकरिता तालुका, जिल्हा व राज्यस्तरावर उत्कृष्ट परसबाग स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. सद्यःस्थितीत २९ जिल्ह्यांच्या परसबागांचे परीक्षण पूर्ण झालेले आहे.

अशी असणार बक्षिसे

परसबाग उपक्रमात तालुकास्तरावर प्रथम क्रमांक ५ हजार रुपये, व्दितीय क्रमांक ३ हजार रुपये, तृतीय क्रमांक २ हजार रुपये, प्रोत्साहनपर १ हजार रुपये याप्रमाणे शाळांना बक्षिसे देण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक १० हजार रुपये, व्दितीय क्रमांक ७ हजार रुपये, तृतीय क्रमांक ५ हजार रुपये, प्रोत्साहनपर २ हजार रुपये याप्रमाणे बक्षीसे मिळणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Khandesh Fodder Crisis: खानदेशात यंदा चारापिके मुबलक

Mulberry Farming: अकोल्यात तुती लागवडीसाठी ६०० एकरांचे लक्ष्य निर्धारित

Mango Export: लंडनला समुद्रमार्गे आंबा पाठविण्याची तयारी

Indian Agriculture: कागदावरील करार, कुसातील हिशेब

Interview with Dada Lad: दादा लाड तंत्रज्ञानाचा देशभर प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT