Farmer Death Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer Death : राज्यात १० महिन्यांत २३६६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

Farmer Issue : राज्यात सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, हवामानातील बदल, शेतीमालाला भाव नसणे अशा अनेक कारणांमुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करीत असल्याचे निदर्शनास आले आहे.

Team Agrowon

Nagpur News : जानेवारी ते ३१ ऑक्टोबर या काळात राज्याच्या विविध भागांत २ हजार, ३६६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची आकडेवारी गुरुवारी (ता. १४) विधानसभेत सादर करण्यात आली. यामध्ये सर्वाधिक म्हणजे ९५१ आत्महत्या अमरावती विभागातील शेतकऱ्यांनी केल्या आहेत.

राज्यात सततची नापिकी, कर्जबाजारीपणा, हवामानातील बदल, शेतीमालाला भाव नसणे अशा अनेक कारणांमुळे राज्यात मोठ्या प्रमाणावर आत्महत्या करीत असल्याचे निदर्शनास आल्याबद्दल व शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये वाढ झाल्याबाबत कुणाल पाटील,

रवींद्र वायकर, राजन साळवी, सुनील प्रभू, अस्लम शेख आदी सदस्यांनी तारांकित प्रश्‍न उपस्थित केला होता. यावर मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने शेतकरी आत्महत्यांची आकडेवारी सादर करण्यात आली.

राज्यात सततची नापिकी, कर्जबाजारीपणा व कर्ज परत फेडीचा तगादा या कारणांमुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे लेखी उत्तरात नमूद केले आहे. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने एक लाख रुपयांची मदत दिली जाते.

विभागनिहाय शेतकरी आत्महत्या

अमरावती-९५१

छत्रपती संभाजीनगर (मराठवाडा)-८७७

नाशिक-२५४

नागपूर-२५७

पुणे-२७

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Chana Market Rate: सध्या हरभऱ्याचा भाव हमीभावापेक्षा ८०० ते ११०० रुपयांपेक्षा कमी

Irrigation Management: सिंचन व्यवस्थापन अराजकतेच्या वळणावर

Smart Farming: पपई- मिरची- खरबूज पद्धतीतून उत्पन्नाचा हुकमी स्रोत

Dairy Farming Success Story: दुग्ध व्यवसाय हेच झाले माझे विश्‍व

Fertilizer Subsidy: खत अनुदान थेट शेतकऱ्यांना देणे शक्य; डीबीटी यंत्रणा उभारण्याच्या कृषिमंत्र्यांच्या सूचना

SCROLL FOR NEXT