Sugarcane Crushing Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing : सातारा जिल्ह्यात २३ लाख टन उसाचे गाळप

Sugarcane Season : सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून ऊस गाळपास वेग दिला आहे. उसाचे क्षेत्र कमी असल्याने नोंद असलेल्या बरोबरीने नोंद नसलेला उस तोडण्यावर भर दिला जात आहे.

Team Agrowon

Satara News : जिल्ह्यात ऊस गाळपास गती आली असून, मंगळवारअखेर (ता.५) २३ लाख ८४ हजार ३८४ टन उसाचे गाळपाद्वारे १९ लाख ६३ लाख ४९५ क्विंटल साखरेची निर्मिती झाली. हंगामाची सुरुवात असल्याने साखर कमी येत आहे. जिल्ह्यात सध्या ८.२३ टक्के साखर उतारा येत आहे. खासगी कारखान्यांच्या तुलनेत सहकारी कारखान्यांना साखर उतारा जास्त मिळत आहे.

जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडून ऊस गाळपास वेग दिला आहे. उसाचे क्षेत्र कमी असल्याने नोंद असलेल्या बरोबरीने नोंद नसलेला उस तोडण्यावर भर दिला जात आहे. कारखान्यांनी जाहीर केलेला दर शेतकरी संघटना मान्य नसून संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला असलातरी सध्या सुरळीत ऊस तोडणी, वाहतुक सुरू आहे.

सर्वच कारखान्यांनी दर जाहीर केला असून प्रतिटन २८५० पासून ३१०० रुपये दर जाहीर केला आहे. जिल्ह्यातील एकूण १५ कारखान्यांकडून ऊस गाळप सुरू आहे. यामध्ये नऊ सहकारी व सहा खासगी कारखान्यांचा समावेश आहे. मंगळवार (ता.५) अखेर १५ कारखान्यांनी २३ लाख ८४ हजार ३८४ टन उसाचे गाळपाद्वारे १९ लाख ६३ लाख ४९५ क्विंटल साखरेची निर्मिती केली आहे.

हंगामाला सुरुवात असल्याने सध्या सरासरी ८.२३ टक्के साखर उतारा येत आहे. साखर उताऱ्यात सहकारी कारखान्यांची आघाडी असून ९.५२ टक्के, तर खासगी कारखान्यांना ७.१५ टक्के साखर उतारा मिळत आहे. जिल्ह्यातील अनेक कारखान्यांची गाळप क्षमता वाढल्याने गाळपाच्या आकड्यात चांगली वाढ होत आहे.

गाळपात जरंडेश्वर सर्वाधिक तीन लाख ६१ हजार ३०० टन व साखर निर्मिती कृष्णा कारखान्याने दोन लाख ९८ हजार ९१० क्विंटल व साखर उताऱ्यात श्रीराम सहकारी कारखान्यांची आघाडी घेतली असून या कारखान्यांस सरासरी १०.३८ टक्के साखर उतारा मिळत आहे. पावसामुळे तोडणी विस्कळीत होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT