Sericulture  Agrowon
ॲग्रो विशेष

Sericulture : शिंगवे येथील २३ शेतकऱ्यांनी विणला ‘रेशीम’ धागा

Silk Production by Farmers in Shingave: पारंपरिक शेतीला पूरक व्यवसाय म्हणून रेशीम शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल सध्या वाढला आहे.

Team Agrowon

Pune News : पारंपरिक शेतीला पूरक व्यवसाय म्हणून रेशीम शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल सध्या वाढला आहे. शिंगवे (ता. आंबेगाव) येथील २३ शेतकऱ्यांनी चार वर्षात ५० एकरावर रेशीम शेती यशस्वीरीत्या फुलवली आहे. रेशीम कोषाला सरासरी प्रतिकिलो ५०० रुपये दर मिळाल्याने शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत आहे.

शिंगवे येथील शेतकरी संतोष गोरडे व रवी कासार हे रेशीम शेतीचा व्यवसाय अनेक वर्षांपासून करत आहे इतर सात शेतकऱ्यांनी त्यांचा अनुभव पाहून चार वर्षांपूर्वी रेशीम शेतीमधील सर्व बारकावे बाबत अभ्यास केला.

तसेच पुण्याच्या रेशीम संचालनालयातील पुणे जिल्हा रेशीम विकास अधिकारी संजय फुले यांची भेट घेऊन रेशीम उद्योगातील संधी बाजारपेठ जोखीम यावर चर्चा करून रेशीम शेती करण्याचा निर्णय घेतला.

त्यानुसार सात शेतकऱ्यांनी सात एकरावर रेशीम शेती करण्यास सुरुवात केली. त्यामध्ये महेश झोडगे, जितेंद्र पोखरकर, सुनील वाव्हळ, बाळासाहेब वाव्हळ, भगवान वाव्हळ पंढरीनाथ वाव्हळ, संदीप वाव्हळ यांचा समावेश आहे.

प्रत्येकाने प्राथमिक स्वरूपात एक-एक एकरावर शेती करण्यास सुरुवात केली त्यासाठी शेडची उभारणी, लोखंडी रॅक कटिंग साहित्य, शेतीसाठी लागणारा खर्च यासाठी प्रत्येकी पाच लाख रुपये खर्च केला.

शेतकऱ्यांना शासनाचे अनुदान देखील प्राप्त झाले आहे. सात शेतकऱ्यांनी प्रायोगिक तत्त्वावर सुरू केलेली रेशीम शेती यशस्वी झाल्यानंतर शिंगवे येथील २३ शेतकऱ्यांनी रेशीम शेतीला प्राधान्य देत आता ५० एकरावर यशस्वी रेशीम शेती यशस्वी फुलवली जात आहे.

कोषाला मिळतो किलोला ६८५ रुपये दर

शिंगवे गावात सुमारे २३ रेशीम शेतीचे शेड असून सुमारे ५० एकर क्षेत्रावर तुतीची लागवड आहे. सर्व शेतकरी एकत्र रेशीम गोणी भरून बीड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी नेत असल्यामुळे वाहनभाडे खर्चात बचत होते. रेशीम कोषाला सर्वाधिक दर किलोला ६८५ रुपये आणि सर्वांत कमी ४५० रुपये दर बीड बाजार समितीमध्ये मिळाला आहे.

नऊ एकर शेतीमध्ये कांदा, ऊस, टोमॅटो आणि भाजीपाला शेती आहे. एकरी रेशीम शेतीमध्ये वर्षभरात ६ बॅच निघाल्या आणि प्रति बॅच २०० किलो रेशीम मिळाले आणि यासाठी ५०० रुपये किलो सरासरी दर मिळाला तरी किमान ६ लाखांचे उत्पन्न मिळाले. त्यानंतर एक एकरावर सुरू केलेला रेशीम शेतीचा व्यवसाय तीन एकरवर वाढवला आहे.
- महेश झोडगे, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update: राज्यातील १४ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा; उन्हाचा चटका वाढला

Farmers Await Compensation: केळी, कांदा नुकसानीची भरपाई कधी मिळणार?

Nandurbar Water Storage: नंदुरबारात अनेक बंधारे, जलसाठे मुबलक

Sugar Industry: साखर उद्योग अडचणीत, समस्यांवर उपाययोजना सुचविण्यासाठी सरकारकडून समिती गठित

Groundnut Procurement: जामोदमध्ये उघड लिलाव पद्धतीने भुईमूग खरेदी सुरू

SCROLL FOR NEXT