Konkan Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : सांगली जिल्ह्यात जुलै महिन्यात २०९ टक्के पाऊस

Team Agrowon

Sangli News : जून महिन्यात समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराजा सुखावला. जुलै महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने दिला होता. जिल्ह्यात जुलै महिन्यात २८३ मिलिमीटर म्हणजे २०९ टक्के पाऊस झाला. गतवर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत यंदाच्या जुलै महिन्यात ८२ टक्क्यांनी अधिक पाऊस झाला आहे. मात्र, जत, आटपाडी या दोन तालुक्यांत कमी पाऊस झाला आहे.

गत वर्षी जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांत कमी पाऊस झाला होता. त्यामुळे खरीप हंगाम हाताशी आला नाही. मात्र, यंदा जिल्ह्यात यंदा वेळेत पाऊस सुरू झाला. जून महिन्यात २२६ मिलिमीटर म्हणजे १७५ टक्के पाऊस झाला. जून महिन्यात ३० दिवसांपैकी १७ दिवस पाऊस झाला. त्यानंतर पावसाने उघडीप दिली होती.

जुलै महिन्यात सर्वसाधारण १३५ मिलिमीटर पाऊस असतो. गत वर्षी जुलै महिन्यात पावसाचा जोर कमी होता. तरीही सरासरीपेक्षा ३६ मिलिमीटरने अधिक पाऊस झाला. जुलै महिन्यात पुन्हा पाऊस सुरू झाला. परंतु पावसाचा जोर कमी होता. यंदाच्या जुलै महिन्याच्या मध्यापासून पावसाचा जोर वाढला.

मिरज, खानापूर, तासगाव, वाळवा-इस्लामपूर, शिराळा, पलूस, कडेगाव या सात तालुक्यांत जुलैच्या मध्यापासून संततधार पाऊस पडला. शिराळा तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. मिरज, वाळवा, शिराळा, पलूस आणि कडेगाव तालुक्यांत गत वर्षीपेक्षा सर्वाधिक पाऊस झाला आहे. दुष्काळी खानापूर-विटा या तालुक्यातही या वर्षीच्या जुलै महिन्यात पाऊस सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

दुष्काळी पट्ट्यातील कवठेमहांकाळ, जत या दोन तालुक्यांत गतवर्षी जुलै महिन्यात सरासरीपेक्षा पाऊस जास्त झाला होता. तर आटपाडी तालुक्यात पावसाने सरासरी वाढली होती. यंदाच्या जत आणि कवठेमहांकाळ आणि आटपाडी तालुक्यात गतवर्षीच्या तुलनेत पाऊस पाऊस कमी असला तरी, सर्वसाधारण पावसापेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गत वर्षी जुलै महिन्यात १७२ मिलिमीटर पाऊस झाला. तर यंदाच्या जुलै महिन्यात २८३ मिलिमीटर पाऊस झाला. जिल्ह्यात गत वर्षीच्या तुलनेत जुलै महिन्यात १११ मिलिमीटरने अधिक पाऊस झाला आहे.

तालुकानिहाय तुलनात्मक पाऊस दृष्टीक्षेप (मिलिमीटर)

तालुका जुलै २०२३ जुलै २०२४

मिरज १५९.८ २२३.८

जत ११२.१ ५७.५

खानापूर-विटा ८५.२ १५४.३

वाळवा-इस्लामपूर १८४.७ ४५८.१

तासगाव १५५.७ १९२.२

शिराळा ४७८.७ ८६१.८

आटपाडी ८६.४ ५५.७

कवठेमहांकाळ १४३.३ १२७.१

पलूस १६१.९ २९४.७

कडेगाव ११३.९ २५८.६

एकूण १७२.१ २८३.६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar MSP : इथेनॉलसह साखरेच्या एमएसपीत वाढ करण्याच्या हालचाली

Banana Rate : केळीला ३२०० रुपये कमाल दर

Potato Production : शिरदाळ्यात बटाटा उत्पादनात घट

pH Level of Water : कीडनाशकांच्या लेबलवर नमूद राहील पाण्याचा सामू

Onion Rate : नगरमध्ये कांदा प्रति क्विंटल ५२०० रुपये

SCROLL FOR NEXT