Drip Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Drip Irrigation Subsidy : सांगली जिल्ह्यात ‘ठिबक’चे २० कोटींचे अनुदान रखडले

Team Agrowon

Sangli News : केंद्र व राज्य शासनाकडून पंतप्रधान कृषी सिंचन योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी ‘प्रति थेंब अधिक पीक’ घेण्यासाठी तुषार व ठिबक योजना राबविण्यात येते. जिल्ह्यातील ६ हजार ६२१ शेतकऱ्यांचे २०२३-२४ मधील ठिबक सिंचनचे २० कोटी ६ लाखांचे अनुदान रखडले आहे. ठिबकचे अनुदान कधी मिळणार याची प्रतीक्षा शेतकरी करू लागले आहेत.

शेतकऱ्यांनी पाण्याचा संरक्षित वापर करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान कृषी सिचन योजनेअंतर्गत ८० टक्के अनुदानावर ठिबक, तुषार संच पुरवण्यात येतात. ‘महा डीबीटी’च्या माध्यमातून शेतकऱ्यांची सोडत (लॉटरी) पद्धतीने निवड केली जाते. निवड झाल्यानंतर खरेदी प्रक्रिया होते. त्यानंतर लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वितरित करण्यात येते. हे अनुदान केंद्र व राज्य शासन वितरित करते. मात्र, काही महिन्यापासून या योजनेच्या अनुदानाला ‘ब्रेक’ लागला आहे. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून सोडत काढलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे.

जिल्ह्यातील ७००७ शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन योजनेत लाभ घेतला होता. त्यापैकी ३८७ शेतकऱ्यांना ९६ लाखांचे अनुदान त्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. गेल्या वर्षी ठिबक संच विक्रेत्याचे पैसे काहीतरी जुळवाजुळव करून भागविले आहेत. परंतु ते अनुदान स्वरूपातील पैसे आज मिळतील उद्या मिळतिल, या आशेने लाभार्थी शेतकरी वाट बघत आहेत. अजूनही अनुदान न मिळाल्याने संबंधित शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे.

मात्र लोकसभा निवडणुकीमुळे आचारसंहिता लागली होती. त्यामुळे अनुदान रखडले. दरम्यान ३१ मार्च पूर्वी हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणे अपेक्षित होते. ठिबकचे अनुदान वर्ग करण्यासाठी जिल्हा कृषी विभागाने कोणत्याही हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे अनुदान अडकले. आता आचारसंहिता संपली पण अनुदान मिळण्यासाठी कृषी विभागाने पाठपुरावा करावा, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

शेतकऱ्यांच्या ‘कृषी’कडे चकरा

ठिबकचे अनुदान कधी जमा होणार याची माहिती घेण्यासाठी शेतकरी कृषी विभागामध्ये हेलपाटे मारत आहेत. परंतु शासनाकडून अनुदान मिळाले नाही. त्यामुळे अनुदान कधीपर्यंत मिळेल हे सांगणे कठीण आहे, अशी उत्तरे मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त होत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Flood Affected Farmer : महापूर बाधित शेतकऱ्यांना मिळणार पैसे, कोल्हापूर कृषी विभागाकडून याद्या अपलोडींगचे काम सुरू

Nandurbar Earthquake : नंदुरबार भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं

Primary Education : हृदय तृप्त करणारे हवे शिक्षण

Market Committee Council : परिषदेचा उठलेला ‘बाजार’

Agriculture Department : अधिकाऱ्यांच्या पदनाम बदलाच्या मागणीस कृषिमंत्र्यांचा दुजोरा

SCROLL FOR NEXT