Farmer compensation Agrowon
ॲग्रो विशेष

Farmer compensation: आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना २० कोटींची मदत होणार वितरित

Farmer Crisis : या तरतुदीची रक्कम विभागीय आयुक्तांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. याबाबतचा शासन निर्णय राज्य सरकारने शुक्रवारी (ता.१६) प्रसिद्ध केला आहे. यामध्ये मागील वर्षीची शेतकरी आत्महत्येची आकडेवारी विचारधीन ठेवून रक्कम वितरित केली आहे.

Dhananjay Sanap

Farmer Issue : नापिकी कर्जबाजारीपणा आणि कर्ज परतफेडीच्या तगाद्यामुळे शेतकरी आत्महत्या प्रकरणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीसाठी २० कोटी रुपयांची तरतूद राज्य सरकारने केली आहे.

या तरतुदीची रक्कम विभागीय आयुक्तांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहेत. याबाबतचा शासन निर्णय राज्य सरकारने शुक्रवारी (ता.१६) प्रसिद्ध केला आहे. यामध्ये मागील वर्षीची शेतकरी आत्महत्येची आकडेवारी विचारधीन ठेवून रक्कम वितरित केली आहे.

यामध्ये कोकण विभागासाथी १२ लाख रुपये वितरित करण्यात येणार आहेत. तर अमरावती विभागात ६ कोटी ७६ लाख रुपये, छत्रपती संभाजीनगर विभागात ४ कोटी ९२ लाख रुपये, नागपूर विभागात ३ कोटी ७५ लाख रुपये, नाशिक विभागात ३ कोटी ३९ लाख आणि पुणे विभागात १ कोटी ६ लाख रुपये वाटप करण्यात येणार आहेत.

राज्यात शेतकरी आत्महत्याचा प्रश्न गंभीर आहे. सततची नापिकी कर्जबाजारीपणा आणि कर्ज परतफेडीच्या तगाद्याने शेतकरी जीवनयात्रा संपवत आहेत. विदर्भ आणि मराठवाड्यात मागील वर्षभरात २०२२ मध्ये १ हजार २३, २०२३ मध्ये १ हजार ८८ आणि २०२४ मध्ये ८२२ शेतकऱ्यांनी जीवन संपवलं आहे.

ही रक्कम मुंबई आणि मुंबई महानगर वगळता उर्वरित जिल्हाधिका-यांना वाटप करण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे वितरित केली आहे. दरम्यान, मागील वर्षीची अनुदान रक्कम रखडून पडल्याची प्रकरण समोर आली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nanded Heatwave: नांदेडला १३ एप्रिलपासून तापमानाचा पारा ४० अंशांवर

Crop Insurance : सुधारित पिक विमा योजनेमुळे शेतकरी भरपाईपासून वंचित?

Mumbai Pune Missing Link Project: मुंबई- पुणे प्रवासाचा वेळ ३० मिनिटांनी कमी होणार, 'मिसिंग लिंक' खुला

Fertilizer Shop License Suspension: तीन कृषी केंद्रांचे परवाने रद्द, तर एकवीस निलंबित

India Rainfall Forecast: मे महिन्यात अधिक पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT