Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Crop Loan : खरिपात २ हजार ९३३ कोटींचे पीककर्ज वितरण

Agriculture Credit : बदलते हवामान, शेतीमालाला कमी दर, अवकाळी पाऊस अशा विविध कारणांमुळे शेतकरी अडचणीत येत आहे. त्यातच खरीप हंगामात त्याला आधार देण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी अडवणूक करू नये, अशा सूचना दिल्या आहेत.

संदीप नवले : अॅग्रोवन वृत्तसेवा

Pune News : जिल्ह्यातील बँकांकडून खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना एक एप्रिलपासून पीककर्जाचे वाटप सुरू केले होते. यंदा जिल्ह्यातील सर्व बॅंकांनी खरीप हंगामात उद्दिष्ट असलेल्या तीन हजार ८९१ कोटी ५७ लाखांपैकी २ हजार ९३३ कोटी ६८ लाख रूपये म्हणजेच ७६ टक्के वितरित केले आहे, अशी माहिती जिल्हा अग्रणी बॅंकेचे (बॅंक ऑफ महाराष्ट्र) मुख्य व्यवस्थापक श्रीकांत कारेगावकर यांनी दिली.

बदलते हवामान, शेतीमालाला कमी दर, अवकाळी पाऊस अशा विविध कारणांमुळे शेतकरी अडचणीत येत आहे. त्यातच खरीप हंगामात त्याला आधार देण्यासाठी शासनाने शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी अडवणूक करू नये, अशा सूचना दिल्या आहेत.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक, युको बॅंक, युनियन बॅंक ऑफ इंडिया, पंजाब नॅशनल बॅंक, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीस बॅंक, कॉर्पोरेशन बॅंक, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ इंडिया, कॅनरा बॅंक, बॅंक ऑफ बडोदा, बॅंक ऑफ महाराष्ट्र आणि सिंडिकेट बॅंक, अॅक्सीस, एचडीएफसी, आयसीआयसीआय, आयडीबीआय, कोटक महेंद्रा, रत्नाकर या बॅंकेकडून कर्जाचे वितरण करण्यात येते.

गेल्यावर्षी याच काळात २ हजार ८४३ कोटी ५५ लाख रुपयांच्या उद्दिष्टांपैकी दोन हजार ७९५ कोटी ४३ लाख रूपये म्हणजे ९८ टक्के वाटप केले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी १८८ टक्के अधिक वितरण केले आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामात भात, मूग, उडीद, सोयाबीन, तूर, ज्वारी, बाजरी अशा विविध पिकांची पेरणी शेतकरी करतात. परंतु या पिकांची पेरणी करताना लागणाऱ्या निविष्ठा खरेदीसाठी काही वेळेस शेतकऱ्यांना अडचणी येतात.

त्यामुळे बहुतांशी शेतकरी पीक कर्जाचा आधार घेऊन खरिपाचे नियोजन करून पिके घेतात. त्यानुसार बॅंकेने शेतकऱ्यांना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून पीककर्ज वाटपास सुरुवात केली. ज्या शेतकऱ्यांनी पीककर्जाची परतफेड केली अशा शेतकऱ्यांना पुन्हा खरिपात तातडीने कर्ज उपलब्ध करून दिले आहे.

यंदा पुणे जिल्हा सहकारी बँकेने तालुका व महत्त्वाच्या गावपातळीवर असलेल्या शाखांमार्फत विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांना कर्जपुरवठा करून तो कर्जरूपाने सभासदांना उपलब्ध करून दिला आहे.

बँकेकडून पाच लाखांपर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याज दराने पीककर्जाचे वाटप केले जात आहे. तर तीन लाखांहून अधिक पीककर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना अकरा टक्के दराने वाटप करत आहेत. खरीप पिकांव्यतिरिक्त बँकेकडून शेतीपूरक व्यवसायांनाही कर्जाचे वाटप करत आहे.

या पिकांसाठी दिले जाते कर्ज ः

तूर, मूग, उडीद, भात, ज्वारी, बाजरी, कपाशी, मका, सुर्यफूल, सोयाबीन, ऊस, टोमॅटो, कांदा, बटाटा, केळी, द्राक्ष, डाळिब, आंबा, गुलाब, जरबेरा, ढोबळी मिरची अशी विविध पिके.

खरीप हंगामात बॅंकनिहाय पीक कर्ज वितरण (आकडे रुपयांत)

बॅंक --- पीक कर्जाचे उद्दिष्ट --- कर्जाचे वाटप --- टक्केवारी

जिल्हा मध्यवर्ती बॅंक -- २४४५ कोटी ४८ लाख -- २११० कोटी ७ लाख -- ८६

राष्ट्रीयीकृत, खासगी बॅंका --- १४४१ कोटी ७६ लाख -- ८६९ कोटी ७४ लाख -- ६०

एकूण --३८९१ कोटी ५७ लाख -- २९३३ कोटी ६८ लाख -- ७६

हंगामात जिल्ह्यातील सर्व बॅंकेने जवळपास ७६ टक्के पीककर्ज वाटप केले आहे. चालू वर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत पीककर्जाच्या उद्दिष्टात वाढ करण्यात आली होती. त्यामुळे कर्जवाटपाची टक्केवारी कमी वाटत असली तरी प्रत्यक्षात गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक पीककर्ज वाटप झाले आहे.
- श्रीकांत कारेगावकर, मुख्य व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बॅंक, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT