Agriculture Mechanization Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Mechanization : कृषी यांत्रिकीकरणाचे दोन कोटी ६८ लाखांचे अनुदान थकले

Agriculture Subsidy : कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजनेतील शेती अवजारे व कृषी सिंचन सुविधेसाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले होते.

Team Agrowon

Nanded News : कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजनेतील शेती अवजारे व कृषी सिंचन सुविधेसाठी शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले होते. यानुसार निवड झालेल्या शेतकऱ्यांनी अवजारे व सिंचन साहित्य खरेदी केली. परंतु कृषी यांत्रिकीकरण उपअभियान योजनेतील ३९२ शेतकऱ्यांचे दोन कोटी ६८ लाख रुपयांचे अनुदान मागील आठ महिन्यांपासून रखडले आहे.

शासनाने उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियान सुरू केले आहे. या अभियानात राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान, राष्ट्रीय गळीत धान्य व तेलताड अभियान, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून शेतकऱ्यांनी पेरणीयंत्र, मळणीयंत्र, रोटावेटर, कल्टीवेटर, विद्युत मोटार, पाईप, यांसह अन्य अवजारे आणि ट्रॅक्टरसाठी अनुदान दिले जाते.

मागील वर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषी यांत्रिकीकरण अभियानातून विविध कृषी अवजारे तसेच कृषी सिंचन सुविधेसाठी अर्ज केले होते. यात निवड झालेल्या शेतकऱ्यांनी अवजारांची खरेदीही केली. परंतु या ३९२ शेतकऱ्यांचे दोन कोटी ६८ लाख रुपयांचे अनुदान मागील सात ते आठ महिन्यापासून रखडले आहे. यामुळे शेतकरी कृषी कार्यालयाकडे खेटे मारत आहेत.

याबाबत कृषी विभागाकडे याविषयी विचारणा केली असता शासनाकडून अनुदानाची रक्कम जमा झाली नसल्याचे सांगण्यात येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. अवजारे खरेदी केल्यानंतर त्याचा शेतीकामासाठी उपयोग केला जातो.

परंतु अनुदान वेळेत मिळाले नाही तर अशा अवजारांना अनुदानासाठी अडचणी निर्माण होतात. यामुळे शासनाने वेळेवर अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीत महिला मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष; दोन जागांसाठी सात उमेदवार

Maharashtra Irrigation: राज्यातील पाणी वापर संस्थांची स्थिती चिंताजनक; निष्क्रिय संस्था बंद करायच्या का? विखे पाटलांचा सवाल

Nanded Farmer Death: १० हजारांचे कर्ज, ७० हजारांची मागणी; कर्ज वसुलीसाठी शेतकऱ्याचं अपहरण अन् हत्या? फायनान्स कंपनीच्या कार्यालयात संशयास्पद मृत्यू

Crop Damage Panchnama: दोन हेक्टरच्या मर्यादेत पंचनामे करण्याचे सरकारचे आदेश; शेतकऱ्यांच्या मदतनिधीला कात्री लागण्याची शक्यता

AI in Sugarcane Farming: ‘एआय’ तंत्रज्ञानाद्वारे ऊस उत्पादन वाढीवर मार्गदर्शन; दुष्काळी परिस्थितीत कृषी विभागाची जनजागृती मोहीम

SCROLL FOR NEXT