Solar Energy agrowon
ॲग्रो विशेष

Solar Energy Generation : बुलडाणा जिल्ह्यात लवकरच १९५ मेगावॉट सौरऊर्जा निर्मिती

Pavankumar Kacchot : सौर उपकेंद्राद्वारे लवकरच १९५ मेगावॉट वीजनिर्मिती होणार असून त्यानंतर ४३ हजार कृषिपंपधारकांना दिवसा वीजपुरवठा केला जाईल, अशी माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी दिली.

Team Agrowon

Buldhana News : महावितरणच्या वीज यंत्रणेचे आधुनिकीकरण व सक्षमीकरण करून वीज ग्राहकांना अखंडित व दर्जेदार वीजपुरवठा केला जात आहे. सौर उपकेंद्राद्वारे लवकरच १९५ मेगावॉट वीजनिर्मिती होणार असून त्यानंतर ४३ हजार कृषिपंपधारकांना दिवसा वीजपुरवठा केला जाईल, अशी माहिती महावितरणचे अधीक्षक अभियंता पवनकुमार कछोट यांनी दिली.

महावितरण व अकोला श्रमिक पत्रकार संघाच्या वतीने ‘महावितरणची कार्यप्रणाली आणि माध्यमांची भूमिका’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार, कार्यकारी अभियंता जयंत पैकीने, राहुल चौधरी, राजेश काठोळे, पवन लोंढे, श्री.अभोरे, श्रमिकचे अध्यक्ष प्रबोध देशपांडे, ज्येष्ठ पत्रकार महेंद्र कवीश्वर प्रामुख्याने उपस्थित होते.

ऊर्जेच्या क्षेत्रात वीज निर्मितीपासून ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा प्रवास, वीज पुरवठ्यातील तांत्रिक मुद्द्यांवर पवनकुमार कछोट यांनी सविस्तर प्रकाश टाकला. महावितरणच्या अकोला मंडळांतर्गत तीन विभाग असून ११५८ मनुष्यबळ कार्यरत आहे. जिल्ह्यात घरगुती, औद्योगिक, वाणिज्यिक, कृषी, उच्चदाब व इतर असे एकूण चार लाख ५० हजार ५६५ ग्राहकांची संख्या आहे.

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेंतर्गत जिल्ह्यात १३३० सौर पंप कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. ६९ हजार ८२० कृषिपंपधारक ग्राहक असून ४२ टक्के त्यांचा वीज वापर आहे. संपूर्ण वीज यंत्रणेवर अतिरिक्त भार होऊ नये म्हणून कृषिपंपांना दिवसा व रात्री प्रत्येकी आठ तास चक्राकार पद्धतीने दोन गटात विभागून वीज पुरवठा केला जातो, अशी माहिती कछोट यांनी दिली.

कृषी वाहिन्या सौर ऊर्जेद्वारे जोडल्या जाणार आहेत. जिल्ह्यात ५३ उपकेंद्रांची निवड केली. ४३ उपकेंद्रासाठी ५२३.५६ हेक्टर प्राप्त झाली असून १९५ मेगावॉट ऊर्जानिर्मितीसाठी निविदा काढल्या आहेत. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर ४३ हजार ग्राहकांना दिवसा वीज पुरवठा केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महावितरणचे जनसंपर्क अधिकारी फुलसिंग राठोड यांनी केले. तर आभार सचिव विशाल बोरे यांनी मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT