Electricity Bill Agrowon
ॲग्रो विशेष

Electricity Bill : चार लाख ग्राहकांकडे १९२ कोटींवर वीजबिल थकीत

Electricity News : परिमंडलातील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक वर्गवारीतील ४ लाख ३१३ ग्राहकांकडे १९२ कोटी १८ लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : परिमंडलातील घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक वर्गवारीतील ४ लाख ३१३ ग्राहकांकडे १९२ कोटी १८ लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे. त्यामुळे बिल वसुली अथवा थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करणे हे दोनच पर्याय वीज कर्मचाऱ्यांसमोर आहेत.

ग्राहकांच्या सोयीसाठी मार्च महिन्यात शनिवार, रविवारसह सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्रे सुरू राहणार आहेत. थकबाकी वसुलीसाठी क्षेत्रीय अभियंते, तांत्रिक कर्मचाऱ्यांसमवेत विभाग, मंडल, परिमंडल कार्यालयातील अभियंते, अधिकारी व कर्मचारी वसुलीच्या कामात व्यग्र आहेत.

वीजबिल भरण्याची मुदत संपलेल्या छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील ४ लाख ३१३ घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक ग्राहकांकडे १९२ कोटी १८ लाख रुपयांची थकबाकी वसूल होणे बाकी आहे. शहर मंडलातील १ लाख १८ हजार ग्राहकांकडे ५२ कोटी ६५ लाख रुपयांची थकबाकी आहे.

ग्रामीण मंडलातील १ लाख ६६ हजार ग्राहकांकडे ४५ कोटी ३१ लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे. जालना मंडलातील १ लाख १५ हजार ५७ ग्राहकांकडे ९४ कोटी २२ लाख रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई व संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी ग्राहकांनी ‍वीजबिल भरणे आवश्यक आहे.

वीजबिल भरणा सोयीचा व्हावा यासाठी या महिन्यात सार्वजनिक सुट्टीच्या दिवशीही वीजबिल भरणा केंद्रे सुरू ठेवण्यात आली आहेत. याशिवाय महावितरणची वेबसाइट, ग्राहकांसाठीचे मोबाईल ॲप, पेमेंट वॉलेट आदींच्या माध्यमातून डेबिट/क्रेडिट कार्ड, नेट बँकिंगमार्फत वीजबिल ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest: ‘शक्तिपीठ’ विरोधासाठी मोहोळमध्ये ‘रास्ता रोको’

Shaktipeeth Protest: ‘शक्तिपीठ’विरोधात महिलांनी अडवला रस्ता

Food Safety First: भेसळयुक्त अन्न रोखण्यासाठी २० जण तैनात

Mixed Cropping: मिश्र पीक पद्धतीचा अंगीकार करावा 

VIP Darshan: पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद करा

SCROLL FOR NEXT