Paddy Varieties  Agrowon
ॲग्रो विशेष

Paddy Bonus : दीड लाखावर धान उत्पादकांना मिळणार १८० कोटींचा बोनस

Paddy Market : धान उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या सहा महिन्यांपासून बोनसची प्रतीक्षा होती. ही प्रतीक्षा अखेर संपली असून शासनाने जिल्ह्यासाठी १८० कोटी ६३ लाख ५६ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Gondia News : धान उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या सहा महिन्यांपासून बोनसची प्रतीक्षा होती. ही प्रतीक्षा अखेर संपली असून शासनाने जिल्ह्यासाठी १८० कोटी ६३ लाख ५६ हजार रुपयांचा निधी मंजूर केला आहे. धान विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केलेल्या दीड लाखांवर शेतकऱ्यांना यामुळे दिलासा मिळाला आहे.

शासकीन धान केंद्रावर धान विक्री करणाऱ्या नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान बोनसची घोषणा नागपूर येथील हिवाळी अधिवेशन २०२४ मध्ये करण्यात आली होती. दोन हेक्‍टरच्या मर्यादेत हेक्‍टरी वीस हजार रुपये याप्रमाणे हा बोनस मिळणार होता. पण या संदर्भातील आदेश निघण्यासाठी तीन महिने गेले.

त्यानंतर बोनससाठी निधी उपलब्ध होण्यास तीन महिन्यांचा कालावधी लागला. आता हा निधी खात्यावर जमा केव्हा होणार? याविषयी शंका व्यक्‍त होत होत्या. याच कारणामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष देखील व्यक्‍त होत होता. शेतकऱ्यांच्या मनातील ही अस्वस्थता व खदखद ओळखत खासदार प्रफुल्ल पटेल यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

या भेटीत त्यांनी धान उत्पादकांसाठी बोनसकरिता निधीची तरतूद करावी, असा मुद्दा मांडला. त्या वेळी अजित पवार यांनी १०० कोटी रुपयांचा निधी मार्केटिंग फेडरेशनला लगेच उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली होती. यानंतर शासनाने शनिवारी (ता. १४) बोनससाठी मार्केटिंग फेडरेशनच्या खात्यात निधी वळता केला.

गोंदिया जिल्ह्यातील एक लाख ५६ हजार शेतकरी बोनससाठी पात्र ठरले असून, त्यासाठी १८० कोटी ६३ लाख ५६ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. बुधवार (ता. १८)पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर हा निधी जमा होण्यास सुरुवात होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

याद्यांची होणार पडताळणी

आदिवासी विकास महामंडळ आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशन अशा दोन्ही ठिकाणी शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. नोंदणीकृत शेतकऱ्यांनाच बोनस मिळणार असला तरी दोन ठिकाणी नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना एकदाच लाभ मिळणार आहे. त्यामुळे याद्यांची पडताळणी केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

...अशी आहे खरेदी

धान खरेदी ः २५ लाख क्‍विंटल

नोंदणी करणारे शेतकरी ः १ लाख ५६ हजार ४३२

फेडरेशनला धान विक्री करणारे शेतकरी ः ७६,२३४

बोनस प्राप्त रक्‍कम ः १८० कोटी ६३ लाख ५६ हजार

धान उत्पादकांना बोनस जाहीर करण्यात आले असले, तरी तो मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता होती. परिणामी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत त्यांच्याकडे निधीसाठी पाठपुरावा केला. अखेरीस १८० कोटी रुपयांचा निधी फेडरेशनला मिळाला असून लवकरच तो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल.
- प्रफुल्ल पटेल, खासदार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Department: उपसंचालक किरण जाधव यांना दक्षता पथकातून हटविले

Maharashtra Politics: मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा

Veterinary Hospitals: राज्यात ३५७ ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखान्यांना मिळणार नवीन इमारती

Donald Trump: भारत-पाक संघर्ष मीच थांबविला

Textile Industry: येवल्यातील पैठणी उद्योगाला मिळणार अधिक चालना

SCROLL FOR NEXT