Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Kharip Crop Insurance : संमतीपत्र न जोडल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १८ हजार ५४० शेतकरी अपात्र

Kharip Pik Vima : पीकविमा कंपनीच्या मनमानी कारभारचा फटका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १८ हजार ५४० शेतकऱ्यांना बसला आहे. यामुळे जिल्ह्यातील या शेतकऱ्यांना खरिप पीकविम्यातून अपात्र ठरवण्यात आले आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यात सध्या दुष्काळाच्या झळा विविध जिल्ह्यांना बसत आहेत. अनेक धरणातील पाणी पातळी घटली असून पिण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. यादरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १८ हजार ५४० शेतकऱ्यांना खरिप पीकविम्यातून अपात्र करण्याचे काम पीकविमा कंपनीने केले आहे. पीकविमा कंपनीने सोयगाव तालुक्यातील कपाशी, मका आणि सोयाबीनसह इतर पिकांचे खरिप पीकविम्याचे प्रस्ताव अपात्र ठरवले आहेत. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून पिक विमा कंपनीविरोधात संताप व्यक्त केला जात आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरिपाच्या पीकविम्यासाठी अर्ज केले होते. तालुक्यातील ५४ हजार शेतकऱ्यांनी २०२३ मधील कपाशी, मका, सोयाबीनसह इतर पिकांसाठी पीकविमा काढला होता. मात्र यातील सुमारे १८ हजार ५४० शेतकऱ्यांनी कुटुंबातील इतर सदस्यांचे संमतीपत्र जोडले नसल्याचे कारण पीकविमा कंपनीने दिले आहे. तसेच या शेतकऱ्यांना अपात्र ठरवत त्यांची गावनिहाय यादी सीएससी केंद्राकडे पाठवली आहे.

दुष्काळाच्या झळा

यंदा पाणी कमी असल्याने दुष्काळाच्या झळा राज्यभर बसत आहेत. यातच पाणी मिळत नसल्याने उभी पीके उन्हाच्या तीव्रतेने होरपळत आहेत. दरम्यान खरिप हंगामाचा पीकविमा काहीच दिवसात हाती पडेल अशी आशा असतानाच पीकविमा कंपनीने शेतकऱ्यांना धक्का दिला आहे. फक्त इतर सदस्यांचे संमतीपत्र नसल्याने कंपनीने पीकविम्याचे प्रस्ताव अपात्र ठरवले आहेत. यामुळे तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

तालुका कृषी अधिकारी मदन सिसोदिया

याप्रकरणी तालुका कृषी अधिकारी मदन सिसोदिया यांनी, 'कंपनीने अपात्र केलेले प्रस्तावांची माहिती मिळाली असून संबंधित कंपनीशी पत्रव्यवहार केला जाईल', असे म्हटले आहे. तर 'याप्रश्नावरून पीकविमा कंपनीच्या जिल्हा समन्वयकाची भेट घेऊन खुलासा मागवला जाईल', असेही सिसोदिया यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Rate : सोयाबीनच्या दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांत संताप

Controversial Sujay Vikhe Sabha : सुजय विखेंच्या सभेतील ‘त्या’ वक्तव्यावरून काँग्रेस आक्रमक

Mahavikas Aghadi : ‘मविआ’चे ६३ उमेदवार जाहीर

Banana Market : केळी दांड्याचे वजन एक किलो गृहीत धरले जाईना

Ravikant Tupkar : ‘क्रांतिकारी शेतकरी संघटना आघाडीबरोबर जाणार नाही’

SCROLL FOR NEXT