Tax Collection Agrowon
ॲग्रो विशेष

Direct Tax Collection : सरकारची तिजोरी भरली;  प्रत्यक्ष कर संकलनात १८ टक्क्यांची वाढ 

Tax Collection :  यंदा देशाच्या तिजोरीतील खणखणाटात भर पडली असून प्रत्यक्ष कर संकलनात वाढ झाली आहे. ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये १७.७ टक्के वाढ झाली आहे. तिजोरीत १९.५८ लाख कोटी आले असून मागील वर्षी ही रक्कम १६.६४ लाख कोटी होती. 

Aslam Abdul Shanedivan

Pune News : आर्थिक वर्ष २०२३-२४ नुकताच संपले असून देशाच्या तिजोरीत प्रत्यक्ष कर संकलनात वार्षिक १७.७ टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे देशाच्या तिजोरीत १९.५८ लाख कोटी रूपये आले आहेत. जी गेल्या वर्षाच्या अंदाजास पेक्षा जास्त असल्याचे अर्थमंत्रालयाच्या कर विभागाने रविवारी (ता.२१) सांगितले. तसेच आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनात झालेली वाढ ही गेल्या वर्षीच्या तुलनेपेक्षा ७.४० टक्क्यांपेक्षा अधिक असून १.३५ लाख कोटी अधिक आहे. विशेष म्हणजे अर्थमंत्रालयाच्या सुधारित अंदाजापेक्षा १३ हजार कोटी रुपये प्रत्यक्ष कर जास्त राहिला आहे. प्रत्यक्ष कर संकलनात आयकर आणि कॉर्पोरेट कर संकलनाचा सर्वाधिक वाटा आहे. 

केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या (सीबीडीटी) माहितीवरून मंत्रालयाने म्हटले आहे की, २०२३-२४ या आर्थिक वर्षात एकूण प्रत्यक्ष कर संकलन (तात्पुरती) १८.४८ टक्क्यांनी वाढून ती २३.३७ लाख कोटी रूपये झाले आहे. तर परताव्यानंतरचे निव्वळ उत्पन्न १७.७ टक्क्यांनी वाढून १९.५८ लाख कोटी रुपये झाले आहे. 

तसेच सीबीडीटीने सांगितले की, २०२३-२४ या आर्थिक वर्षात ३.७९ लाख कोटी रुपयांचा परतावा जारी करण्यात आला आहे. जो परताव्याच्या तुलनेत २२.७४ टक्के अधिक आहे. यामुळे प्रत्यक्ष कर संकलन (परतावा वगळता) बजेट अंदाजापेक्षा ७.४० टक्के जास्त असून तो सुधारित अंदाजापेक्षा ०.६७ टक्के जास्त आहे.

या कालावधीत, परताव्याच्या समायोजनापूर्वी प्रत्यक्ष करांचे एकूण संकलन २३.३७ लाख कोटी होते. जी आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील १९.७२ लाख कोटी रुपयांच्या एकूण संकलनापेक्षा १८.४८ टक्के अधिक आहे. तर मागील आर्थिक वर्षात सकल कॉर्पोरेट कर संकलन (तात्पुरते) १० लाख कोटी रुपयांच्या तुलनेत १३.०६ टक्क्यांनी वाढून ११.३२ लाख कोटी रुपये झाल्याचे मंत्रालयाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.  

सीबीडीटीनुसार, आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये निव्वळ कॉर्पोरेट कर संकलन (तात्पुरते) ९.११ लाख कोटी रुपये होते. जे मागील आर्थिक वर्षाील ८.२६ लाख कोटी रुपयांपेक्षा १०.२६ टक्के जास्त आहे. या कालावधीत सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (तात्पुरती) सह एकूण वैयक्तिक आयकर संकलन १२.०१ लाख कोटी रुपये होते. जे गेल्या आर्थिक वर्षातील ९.६७ लाख कोटींच्या संकलनापेक्षा २४.२६ टक्के अधिक आहे. सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्ससह निव्वळ वैयक्तिक आयकर संकलन १०.४४ लाख कोटी रुपये होते. मागील आर्थिक वर्षातील ८.३३ लाख कोटी रुपयांच्या संकलनापेक्षा हे २५.२३ टक्के अधिक आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT