PM Kisan Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

PM Kisan Yojana : पीएम किसान १८ व्या हप्त्यापासून कोल्हापूर जिल्ह्यातील १७ हजार शेतकरी राहणार वंचित

PM Kisan E-KYC : ई-केवायसी व आधार लिंक नसल्यामुळे १७ हजार शेतकऱ्यांना अठरावा हप्ता मिळणार नसून सुमारे ३४ लाख रुपयांपासून शेतकरी वंचित राहणार आहेत.

sandeep Shirguppe

Central Government PM Kisan Scheme : केंद्र सरकारकडून ''पी एम किसान''सन्मान निधी योजनेचा अठरावा हप्ता ५ ऑक्टोबरला देण्याची तयारी सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील १७ हजार २६१ दाखल केलेले प्रस्ताव ई केवायसीमुळे रखडले आहेत. शेतकरी या हप्त्याच्या ३४ लाख रुपयांपासून वंचित राहणार आहेत. जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकऱ्यांना १२५ कोटी रुपये प्राप्त होणार आहेत.

देशभरात पीएम किसान सन्मान निधी योजनेचे ९.५ कोटी शेतकरी लाभार्थी आहेत. या योजनेसाठी २० हजार कोटी रुपयांचा शेतकऱ्यांना लाभ दिला आहे. राज्यात एक कोटी तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ४ लाख ६६,६७३ लाभार्थी आहेत. दरम्यान यामध्ये बँक खाते आधारशी लिंक नसलेले १३ हजार ३४७, तर ई-केवायसी पेंडिंग असलेले ३ हजार ९१४ असे एकूण १७ हजार २६१ शेतकरी आहेत.

ई-केवायसी व आधार लिंक नसल्यामुळे १७ हजार शेतकऱ्यांना अठरावा हप्ता मिळणार नसून सुमारे ३४ लाख रुपयांपासून शेतकरी वंचित राहणार आहेत. अशा शेतकऱ्यांनी स्वतः बँकेमध्ये जाऊन बँक खात्याशी आधार लिंक करावा अथवा पोस्टात खाते काढण्याचे आवाहन कृषी विभागाकडून देण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाशीम येथून ५ ऑक्टोबरला हप्ता देण्याची तयारी सुरू तयारी सुरू आहे. याबाबत कृषी खात्याला अधिकृत पत्र अद्याप प्राप्त झालेले नाही. या हप्त्याचे जिल्ह्यातील साडेचार लाख शेतकऱ्यांना १२५ कोटी रुपये मिळणार आहेत. काही शेतकऱ्यांचे एक, दोन किंवा तीन पेंडिंग असलेले हप्तेही मिळण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्यांचा दसरा-दिवाळी गोड होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

SCROLL FOR NEXT