MGNREGA Labor Agrowon
ॲग्रो विशेष

MGNREGA Labor : नगर जिल्ह्यात रोहयोवर १७ हजार १४६ मजूर

Team Agrowon

Nagar News : नगर जिल्ह्यात या वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने रोजगार हमी योजनेवरील मजुरांची संख्या जास्त आहे. मागील वर्षी याच कालावधीत मे महिन्यात जिल्ह्यात ८ हजार ९८९ मजूर रोहयोवर होते. जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि महसूल विभागाची १ हजार ९७१ कामे सुरू असून त्याठिकाणी १७ हजार १४६ मजूर उपस्थित आहेत.

जिल्ह्यात मागील पावसाळ्यात पर्जन्यमान कमी झाल्यामुळे ऑगस्ट २०२३ महिन्यातच राज्य शासनाने जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती घोषित केली होती. खरीप हंगाम पावसाने ताण दिल्याने शेतकऱ्यांच्या पदरी निराश पडली. त्यानंतर परतीचा पाऊस होऊन रब्बी हंगामात पिके साधतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती.

परतीचा पाऊसही समाधानकारक झाला नाही. शेतकऱ्यांच्या पदरी निराश पडली. रब्बी हंगामात शेतीसाठी पाणी नसल्याने उन्हाळ्यात ग्रामीण भागात शेत मजुरांना रोजगार हमी योजनेशिवाय रोजगाराचा कोणताही पर्याय शिल्लक नाही. जिल्ह्यात एप्रिल महिन्यात उन्हाचा कडाका वाढत असताना पारा ४० अशांच्या आसपास आला आहे. ग्रामीण भागात मजुरांनी रोजगारासाठी रोहयोला पंसती असल्याचे चित्र आहे.

जिल्ह्यात सध्या रोहयोतून घरकुल, सिंचन विहिरी, पाणंद रस्ते, गुरांचे गोठे, रोपवाटिका, वृक्ष संगोपन यासह व्यक्तीगत लाभाच्या अनेेक योजनाही सुरू आहेत. रोहयोअंतर्गत जिल्ह्यात गावपातळीवर मजुरांकडून कामांची मागणी प्राप्त होताच तातडीने कामे उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी तहसीलदार व पंचायत समितींच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत असे रोजगार हमी विभागातून सांगण्यात आले.

दृष्टिक्षेपात....

तालुका मजूर कामे

अकोले ४८१ २१२

जामखेड ८,८०० ७४२

कर्जत ४५४ ६२

कोपरगाव १८९ ६५

नगर ३८३ ५५

नेवासे १६५ ३५

पारनेर १,०९२ ७४

पाथर्डी ८९४ १०७

राहाता १५४ ४९

राहुरी २२३ ५८

संगमनेर १,०७६ २०३

शेवगाव २५८३ २५७

श्रीगोंदे ६६८ ११७

श्रीरामपूर ८४ २६

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : कांद्यात चढ उतार कायम; कापूस, सोयाबीन, कांदा तसेच काय आहेत टोमॅटो दर?

Khapali Wheat : खपली गहू लागवडीला हवे प्रोत्साहन

Nana Patole : शेतकऱ्यांचा आवाज सत्तेपर्यंत पोहोचवणारे नाना पटोले

Farmers Welfare : शेतकरी कल्याणाचा वसा

Return Monsoon : परतीचा माॅन्सून महाराष्ट्रात दाखल; राज्यातील काही भागात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT