Well Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Well Repair Subsidy : जुनी विहीर दुरुस्तीसाठी १४४ लाभार्थ्यांचे लक्ष्य

Agriculture Department News : नागपुर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या खचलेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी पहिल्यांदाच शेष फंडातून अनुदान देण्याचा निर्णय घेतला.

Team Agrowon

Nagpur News : नागपुर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या खचलेल्या विहिरींच्या दुरुस्तीसाठी पहिल्यांदाच शेष फंडातून अनुदान देण्याचा निर्णय घेतला. या निधीतून १४४ लाभार्थ्यांना अनुदान देण्याचे निश्चित असून अर्ज मात्र दुप्पटीवर आले आहेत.

नुकत्याच झालेल्या कृषी समितीच्या बैठकीत पात्र लाभार्थ्यांच्या यादीला मंजुरी मिळाल्याची माहिती आहे. उर्वरित, पात्र लाभार्थी शेतकऱ्यांना नेमका कसा लाभ देण्यात येईल, हे अद्याप निश्‍चित करण्यात आले नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सातबारावर विहीर असल्याचा उल्लेख असणे आवश्यक आहे.

विहीर शेतकऱ्याने स्वखर्चातूनन अर्थात कुठल्याही योजनेचा लाभ न घेता बांधली असावी, अशी अट आहे. पावसाच्या दिवसात किंवा अतिवृष्टीने सिमेंटच्या विहिरीसह पक्के बांधकाम नसलेल्या विहिरी खचतात. या विहिरींचे दुरुस्ती काम करणे ही खर्चीक बाब असल्याने शेतकरी त्या जैसे थे अवस्थेत ठेवतात.

परंतु या विहिरींच्या पाण्याच्या ‘ओव्हर फ्लो’मुळे शेतातील इतर पिके खराब होतात. हा मोठा फटका शेतकऱ्यांना असतो. आता या योजनेच्या लाभामुळे ही वेळ शेतकऱ्यांवर येणार नाही. २०२३-२४ या वर्षाकरिता इतर व सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांकरिता जुनी विहीर दुरुस्तीकरिता ७५ टक्के किंवा ५० हजार रुपयांच्या मर्यादेत अनुदान देण्याची तरतूद करण्यात आली.

यासाठी सेस फंडात ७२ लाख ७९ हजार २०० रुपयांची तरतूद करण्यात आली. १४४ शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल. परंतु अर्ज ३०० च्या जवळपास आलेत. जिल्हा परिषदेच्या या योजनेला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wheat Procurement Target: शेतकऱ्यांना मोठा दिलासा, केंद्राने गहू खरेदीचे उद्दिष्ट १५ टक्क्यांनी वाढवले

Dairy Farming Challenges: टंचाईचा फेरा, आधी चारा पेरा

Goda to Narmada Jalyatra: जल चळवळीतील कार्यकर्ते, संस्थांचा विसर

Agriculture Campaigns: खरीप हंगामासाठी राज्यात १८ मोहिमा राबविणार

Climate Resilient Farming: मराठवाड्यात उत्पादकता वाढीसाठी होणार हवामानानुकूल सुधारणा

SCROLL FOR NEXT