MAGNET Project Agrowon
ॲग्रो विशेष

MAGNET Project : ‘मॅग्नेट’साठी १३६ कोटी वितरणास मान्यता

Agriculture Project : राज्य सरकारने यंदाच्या आर्थिक वर्षासाठी १७२ कोटी ४४ रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. यापैकी ५४ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी याआधी वितरित केला आहे.

Team Agrowon

Mumbai News : आशियाई विकास बँकेच्यावतीने अर्थसाहाय्य करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्प (मॅग्नेट)साठी १३६ कोटी २२ लाख रुपयांच्या निधी वितरणास राज्य सरकारने मान्यता दिली आहे.

राज्य सरकारने यंदाच्या आर्थिक वर्षासाठी १७२ कोटी ४४ रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद केली आहे. यापैकी ५४ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी याआधी वितरित केला आहे.

आशियाई विकास बँकेच्या अर्थसाहाय्याने राज्यात ऑक्टोबर २०२० मध्ये मॅग्नेट प्रकल्प राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या हिश्शातून हा प्रकल्प चालविण्यात येत असून यंदा राज्य हिश्शाकरिता ५३ कोटी २७ लाख तर बाह्य हिश्शाकरिता २१९ कोटी १७ लाख ८० हजार रुपयांचा निधी अर्थसंकल्पित करण्यात आला होता.

याआधी यापैकी २० टक्के रक्कम वितरित करण्यात आली असून डिसेंबर महिन्यात ७० टक्के रक्कम वितरित करण्यास राज्य सरकारने मान्यता दिल्याने पणन विभागाने हा निधी वितरित करण्याचे आदेश काढले आहेत.

यामध्ये २६ लाख ६३ हजार ५० रुपये राज्य हिश्शाकरता तर बाह्य हिश्शाचे १०९ कोटी ५८ लाख ५० हजार असा एकूण १३६ कोटी २२ लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात मान्यता देण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Relief: नाशिकसह तीन जिल्ह्यांतील १ लाख ४५ हजार शेतकऱ्यांना दिलासा, ८६ कोटी ६५ लाख मदत मंजूर

Agri University Research : कृषी विद्यापीठाची संशोधनात ओळख अधिक बळकट होईल

Ring Road Project : रिंग रोड बाधितांचा शासनाविरोधात एल्गार

Murrah Buffalo Subsidy: मुऱ्हा म्हैस खरेदीसाठी ‘चितळे’ देणार अनुदान

Kisan Credit Card : किसान क्रेडिट कार्ड, पशू किसान क्रेडिट कार्डातील अडचणी सोडवा

SCROLL FOR NEXT