Water Storage Agrowon
ॲग्रो विशेष

Water Stock : परभणी जिल्ह्यातील लघू प्रकल्पात १३ टक्के पाणीसाठा

Water Shortage : उपसा, बाष्पीभवन आदी कारणांमुळे जिल्ह्यातील जल प्रकल्पांतील पाणीसाठा कमी होत आहे. येत्या काळात पाणी टंचाईचे स्वरूप गंभीर होण्याची शक्यता आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील २२ पैकी ११ लघू प्रकल्पांमध्ये सरासरी १३ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.१ लघू प्रकल्प तलाव कोरडा पडला आहे तर ७ लघू प्रकल्पांच्या तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.

दोन मध्यम प्रकल्पात सरासरी १९ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. उपसा, बाष्पीभवन आदी कारणांमुळे जिल्ह्यातील जल प्रकल्पांतील पाणीसाठा कमी होत आहे. येत्या काळात पाणी टंचाईचे स्वरूप गंभीर होण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यातील लघू प्रकल्पांमध्ये गुरुवारी (ता. १६) सरासरी १३ टक्के पाणीसाठा उपलब्ध होता.त्यात पेडगाव (ता. परभणी) येथील तलावात १२ टक्के, आंबेगाव (ता. मानवत) येथील तलावात ९ टक्के, वडाळी (ता. जिंतूर) येथील तलावात ३ टक्के, आडगाव (ता. जिंतूर) येथील तलावात २६ टक्के,

केहाळ (ता. जिंतूर) येथील तलावात २ टक्के, भोसी (ता. जिंतूर) येथील तलावात १५ टक्के, कवड (ता. जिंतूर) येथील तलावात २ टक्का, मांडवी (ता. जिंतूर) येथील तलावात २ टक्के, पाडाळी(ता. जिंतूर) येथील तलावात ७ टक्के उपयुक्त पाणीसाठा होता.

झरी (ता. पाथरी )येथील तलावात ७१ टक्के, पिंपळदरी (ता. गंगाखेड) येथील तलावात २१ टक्के,राणीसावरगाव (ता. गंगाखेड) येथील तलावात ५८ टक्के, टाकळगाव (ता. गंगाखेड) येथील तलावात १३ टक्के, तांदुळवाडी (ता. पालम) येथील तलावात ५१ टक्के पाणीसाठा होता.

गतवर्षी (२०२२) याच तारखेला लघुतलावांत सरासरी ३५.८८६ दलघमी (८५टक्के) उपयुक्त पाणीसाठा होता. चारठाणा (ता. जिंतूर) लघू प्रकल्प कोरडा आहे. देवगाव, जोगवाडा, बेलखेडा, चिंचोली, दहेगाव (सर्व ता. जिंतूर), नखावाडी (ता. सोनपेठ), कोद्री (ता. गंगाखेड) या ७ लघू तलावांतील पाणीसाठा जोत्याखाली गेला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 344.74 कोटीं निधी वळवला

Silkworm Monsoon Care: पावसाळ्यात रेशीम अळी संगोपन करताना घ्यावयाची काळजी

Kisan Credit Card: किसान क्रेडिट कार्ड : मत्स्य व्यवसायासाठी आर्थिक सक्षमीकरण

Monsoon Parasite Control: पावसाळ्यातील परजीवी कीटकांचे एकात्मिक व्यवस्थापन

Animal Health Protection: पशू, मानव आरोग्याचे संरक्षण

SCROLL FOR NEXT