Rural Banking  Agrowon
ॲग्रो विशेष

Rural Banking : आता गावागावात बँकिंग सेवा ; बँकाच्या नवीन शाखा मार्चपर्यंत सुरू करण्याचे निर्देश

Buldana National Bank Branch : ग्रामीण भागात ज्या ठिकाणी राष्ट्रीयीकृत बँकाच्या शाखा नाहीत अशा ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा सुरू कराव्यात असे निर्देश यापूर्वी देण्यात आले होते.

Team Agrowon

Buldana News : जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये १३ ठिकाणच्या ग्रामीण क्षेत्रांमध्ये नॅशनल बँकांच्या नवीन शाखांना केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मान्यता दिल्याने मान्यताप्राप्त शाखा ३१ मार्चपर्यंत सुरू करण्याचे निर्देश केंद्रीयमंत्री आयुषमंत्री (स्वतंत्र प्रभार) तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी दिले. बँकिंग अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

२८ फेब्रुवारीला झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक के. के. सिंग, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक प्रमोद लांडे, यासह विविध बँकांचे, राष्ट्रीय वित्तीय संस्थांचे विभागीय व्यवस्थापक उपस्थित होते.

ग्रामीण भागात ज्या ठिकाणी राष्ट्रीयीकृत बँकाच्या शाखा नाहीत अशा ठिकाणी राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा सुरू कराव्यात असे निर्देश यापूर्वी देण्यात आले होते. त्या अनुषंगाने केंद्रीय अर्थमंत्रालयाकडे मागणी सुद्धा करण्यात आली होती.

त्यानुसार आता जिल्ह्यातील मलकापूर येथे कॅनरा बँक, चिखली येथे बँक ऑफ बडोदा, शेगाव येथे बँक ऑफ बडोदा, जळगाव जामोद येथे बँक ऑफ इंडिया तर ग्रामीण भागातील मेहकर तालुक्यातील अंजनी बुद्रुक येथे बँक ऑफ बडोदा, खामगाव तालुक्यातील अंत्रज, गोधनापूर, कंझारा येथे अनुक्रमे कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, युनियन बँक ऑफ इंडिया तर लोणार तालुक्यातील वणी येथे सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, चिखली तालुक्यातील इसोली येथे युको बॅंक, शेगाव तालुक्यातील लांजूड येथे इंडिया बॅंक आणि संग्रामपूर तालुक्यातील कवठळ येथे पंजाब नॅशनल बँक अशा शाखा सुरू होणार आहेत. या संदर्भातील राज्यस्तरीय बँकर्स समितीने (SLBC) परिपत्रक निर्गमित केले आहे.

मोठ्या गावात बँका सुरू करण्यासाठी नव्याने सर्व्हे करा

पूर्वी जिल्हा केंद्रीय बँकेच्या जिल्हाभरात शाखा असल्याने शेतकऱ्यांना जिल्हा बँकेच्या वतीने पीककर्ज मिळत होते. परंतु जिल्हा बँकेच्या शाखा बँक अवसायनात गेल्याने बंद पडल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिककर्जासाठी खासगी सावकारांकडून अव्वाच्या सव्वा व्याजाने कर्ज घ्यावे लागते.

जिल्ह्यामध्ये राष्ट्रीयकृत बँकाच्या शाखांची अजूनही गरज असल्याने जिल्हा बँकाच्या बंद पडलेल्या शाखांच्या ठिकाणी तसेच जास्त लोकसंख्येच्या गावांमध्ये सर्वे करून राष्ट्रीयकृत बँकाच्या शाखा सुरु करण्याबाबत जाधव यांनी बैठकीत निर्देश दिले.

अर्थमंत्री सितारामण यांचे मानले आभार

जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात नविन राष्ट्रीयकृत शाखांना केंद्रीय अर्थ मंत्रालयाने मान्यता दिल्याने जाधव यांनी केंद्रीय अर्थमंत्री श्रीमती निर्मला सितारामण यांचे यावेळी आभारही मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agri Machinery : महिला बचत गटांना ‘कृषी अवजारे बँके’ची सुवर्णसंधी

Akola Drought Update : अकोला जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करा : गवळी

Jambatanda Storage Tank : जांबतांडा साठवण तलावासाठी प्रशासनाकडून हालचाली

Sangli Rainfall : सांगलीत ऑगस्टच्या पहिल्या २१ दिवसांत ५१ टक्के पाऊस

Water Security : नियोजनातून जलसुरक्षेचा पाया मजबूत करण्याचा प्रयत्न : डॉ. गेडाम

SCROLL FOR NEXT