Maharashtra Election Agrowon
ॲग्रो विशेष

Chhatrapati Sambhajinagar Vidhansabha Election : छत्रपती संभाजीनगर शहरात १२९०, ग्रामीणमध्ये १९८३ मतदान केंद्र

Vidhansabha Election 2024 : जिल्ह्यात ३२७३ मतदान केंद्रे असून त्यापैकी शहरी भागात १२९० तर ग्रामीणमध्ये १९८३ केंद्रे आहेत. संवेदनशील मतदान केंद्रे ४० असून सहाय्यकारी मतदान केंद्रे ९ असल्याची माहिती प्रशासनने दिली.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यात ३२७३ मतदान केंद्रे असून त्यापैकी शहरी भागात १२९० तर ग्रामीणमध्ये १९८३ केंद्रे आहेत. संवेदनशील मतदान केंद्रे ४० असून सहाय्यकारी मतदान केंद्रे ९ असल्याची माहिती प्रशासनने दिली. बुधवारी (ता. २०) विधानसभा मतदार संघासाठी मतदान होत़े आहे. त्यासाठी मतदानयंत्रे मंगळवारी (ता. १९) रवाना झाली.

जाहीर प्रचार कालावधी संपल्यानंतर प्रशासनाच्या वतीने पत्रकार परिषद जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात सोमवारी (ता. १८) पार पडली. या वेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, अपर पोलिस अधीक्षक सुनील लांजेवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके आदी उपस्थित होते.

या वेळी ही माहिती देण्यात आली. १८३ उमेदवार निवडणूक रिंगणात जिल्ह्यात या निवडणूक प्रक्रियेसाठी सर्व नऊ मतदार संघ मिळून एकूण ३९७ उमेदवारांनी अर्ज दाखल केला. २१४ उमेदवारांनी आपले अर्ज माघारी घेतल्यानंतर एकूण १८३ उमेदवार सध्या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी आहेत.

निवडणूक प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी जिल्ह्यात पाच निवडणूक निरीक्षक भारत निवडणूक आयोगामार्फत नियुक्त करण्यात आले आहेत. ३ लाख ३७ हजार ५०६ वाहनांची तपासणी आचारसंहिता कक्षाअंतर्गत विविध पथकांमार्फत ३ लाख ३७ हजार ५०६ वाहनांची तपासणी करण्यात आली असून २९ कोटी ४० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सी व्हिजिल ॲपद्वारे नागरिकांनी २९४ तक्रारी दाखल केल्या. त्यापैकी २६९ तक्रारी शंभर मिनिटांच्या आत निकाली काढण्यात आल्या. लेखी प्राप्त झालेल्या २३ तक्रारींचा निपटारा पूर्णपणे करण्यात आला आहे. ४०७१ जणांनी केले गृह मतदान गृह मतदानासाठी ४७१४ अर्ज प्राप्त होते त्यापैकी ४०७१ जणांनी मतदान केले आहे.

गृह मतदानासाठी १४० पथके तयार करण्यात आली होती तसेच १४२ सूक्ष्मनिरीक्षकांची नियुक्ती केली. १४९ वाहने वापरण्यात आली. टपाली मतदान १३,३४१ असून त्यापैकी ९,६९९ मतदान झाले. सैन्य दलातील २,५०८ मतदान आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर वैद्यकीय सुविधा आणि सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Market : कांद्याचे बाजारभाव आणखी किती दिवस टिकतील? बाजारातील आवक कमीच

Cotton Pest Attack : कपाशीच्या पिकावर अळीचा हल्ला; पानांची चाळणी

Soybean Market : सोयाबीनची आवक राज्यातील बाजारांमध्ये शिगेला; भावामुळे शेतकऱ्यांची मोठी गोची

Nanded Vidhansabha Election : नांदेडमध्ये लोकसभेसह विधानसभेसाठी २५ वर्षांनंतर मतदान

Sugarcane Crushing : गाळपासाठी नांदेड विभागातील २५ साखर कारखान्यांना परवाना

SCROLL FOR NEXT