Nanded Vidhansabha Election : नांदेडमध्ये लोकसभेसह विधानसभेसाठी २५ वर्षांनंतर मतदान

Vidhansabha Election : नांदेड : नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीसाठी २५ वर्षांनंतर एकाचवेळी निवडणूक होत आहे. बुधवारी (ता. २०) मतदानानंतर लगेच शनिवारी (ता. २३) मतमोजणी होणार आहे.
Vidhansabha Election
Vidhansabha ElectionAgrowon
Published on
Updated on

Nanded News : नांदेड : नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीसाठी २५ वर्षांनंतर एकाचवेळी निवडणूक होत आहे. बुधवारी (ता. २०) मतदानानंतर लगेच शनिवारी (ता. २३) मतमोजणी होणार आहे. प्रशासनाच्या वतीने निवडणुकीसाठी जय्यत तयारी केली आहे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदानासाठी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) राजकुमार माने उपस्थित होते. मतदान शांततेत पार पडावे यासाठी जिल्ह्यात सर्व मतदार संघांत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत. त्यामुळे कोणीही कायदा हातात घेऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था भंग होणार नाही याची काळजी घ्यावी पाच व पाचपेक्षा अधिक लोकांनी एकत्रित येणे प्रतिबंधित केले आहे.

मतदान करताना विहित कार्यपद्धती आखून दिलेली आहे, त्यानुसार मतदान करावे. ज्या मतदाराकडून मतदान करतानाच्या प्रक्रियेची छायाचित्र, व्हिडिओ, रिल्स, केल्या जातील त्या समाज माध्यमावर प्रसारित केल्या जातील, अशा मतदाराविरुद्ध लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १२८ नुसार पोलिस कारवाई केली जाईल, याची सर्वानी नोंद घ्यावी.

Vidhansabha Election
Vidhansabha Election 2024 : विधानसभेचे सोलापूर जिल्ह्यातील ३७२३ केंद्रांवर मतदान

एखाद्या व्यक्तीने मतदान केंद्रामधून मतदान यंत्र अनधिकृतपणे बाहेर नेले अथवा तसा प्रयत्न केला तर अशी व्यक्ती एका वर्षाचा कारावास किंवा पाचशे रुपयांपर्यंत दंडास किंवा दोन्हीही शिक्षेस पात्र ठरेल याची नोंद घ्यावी. या वेळी सर्व मतदाराना वेगळा अनुभव येणार असून २५ वर्षांनंतर नांदेडला एका शाईमध्ये दोनदा मतदान करता येणार आहे. तरी नागरिकांनी २० नोव्हेंबरला आपले मत देशासाठी द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

आज सार्वजनिक सुट्टी

बुधवारी (ता. २०) मतदानासाठी सर्व आस्थापनांना शासकीय सुटी देण्यात आली आहे. तसेच खासगी आस्थापनावरील अत्यावश्यक सेवेतील सर्व कर्मचाऱ्यांना दोन तासांची सुटी मतदानाबाबत देण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात जिल्हा उद्योग विभागाने देखील सर्व अत्यावश्यक यंत्रणांना सूचना दिल्या आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com