Cotton Soybean Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Soybean Subsidy : नगरमधील ४ लाख शेतकऱ्यांना १२९ कोटींचे अनुदान वाटप

Team Agrowon

Nagar News : राज्य शासनाकडून दिल्या जाणाऱ्या कापूस, सोयाबीन अनुदानासाठी नगर जिल्ह्यात ५ लाख ३० हजार शेतकरी पात्र आहेत. अनुदान वाटपाला राज्यभर सुरुवात झाली असून आतापर्यंत नगर जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ४ लाख शेतकऱ्यांना १२९ कोटी ४३ लाख २५ हजारांचे वाटप केले असल्याची माहिती देण्यात आली.

राज्यातील कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २०२३ च्या खरीप हंगामासाठीचे अनुदान वितरणाचा प्रारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने नुकताच करण्यात आला. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये प्रतिहेक्टर असे दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रत्येकी ५ हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय झालेला आहे.

पहिल्या टप्प्यात राज्यातील ४९ लाख ५० हजार खातेदारांच्या खात्यांमध्ये २३९८ कोटी ९३ लाख रुपये जमा करण्यात येत आहेत. राज्यात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची संख्या सुमारे ९६ लाख ७८७ आहे.

राज्य सरकारच्या वतीने निकषानुसार नगर जिल्ह्यात ५ लाख ३० हजार शेतकरी पात्र आहेत. त्यापैकी ४ लाख १२ हजार ३७१ शेतकऱ्यांच्या खात्यावर १२९ कोटी ४३ लाख २५ हजारांची मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग झाली आहे.

उर्वरित शिल्लक शेतकऱ्यांच्या खात्यावरही मदत लवकरच वर्ग होणार असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात कापूस पिकासाठी पहिल्या टप्प्यात १ लाख ७४ हजार १५२ शेतकऱ्यांच्या खात्यावर ५४ कोटी ७५ लाख ५६ हजार, तर सोयाबीन पिकासाठी २ लाख ३८ हजार २१९ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर ७४ कोटी ६७ लाखांचे अनुदान जमा करण्यात आले आहे. अद्याप साधारण एक लाख तीस हजार शेतकऱ्यांना अनुदान द्यायचे राहिले असून त्यांचेही लवकरच वाटप होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

तालुकानिहाय अनुदान मिळालेले शेतकरी (कंसात अनुदान)

नगर २१ हजार ५६४ (७ कोटी ९ लाख १३ हजार)

पारनेर २८ हजार ३० (७ कोटी ३२ लाख २२ हजार)

पाथर्डी ४० हजार ९२८ (११ कोटी ५ लाख ३१ हजार)

कर्जत ९ हजार १३८ (२ कोटी ६० लाख ७२ हजार)

जामखेड २५ हजार ३६९ (६ कोटी ९९ लाख ९६ हजार)

श्रीगोंदा १९ हजार ४२९ (५ कोटी ९२ लाख ७५ हजार)

श्रीरामपूर २२ हजार ६६५ (८ कोटी ५३ लाख ९५ हजार)

राहुरी ३३ हजार १ (१० कोटी ७५ लाख ४६ हजार)

नेवासा ५२ लाख ४५६ (१९ कोटी १ लाख ६९ हजार)

शेवगाव ३७ हजार ६ (१२ कोटी ३४ लाख ३५ हजार)

संगमनेर ३६ हजार ७८१ (१० कोटी ३६ लाख ३६ हजार)

कोपरगाव २२ हजार ८६७ (५ कोटी ३८ लाख १७ हजार)

अकोले २२ हजार ८६७ (५ कोटी ३८ लाख १७ हजार)

राहाता २९ हजार ९६९ (१० कोटी २१ लाख ८१ हजार)

नगर जिल्ह्यात पाच लाखांहून अधिक शेतकरी मदतीसाठी पात्र आहेत. केवायसी पूर्ण करण्यात आलेल्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पुढील टप्प्यात उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावरदेखील अनुदानाची रक्कम जमा करण्यात येईल.
- सुधाकर बोराळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Loss Compensation : अतिवृष्टी नुकसानीचे २२ कोटी ३३ लाख अनुदान

Crop Damage Compensation : पीक नुकसानीचे अनुदान आठवडाभरात शेतकऱ्यांच्या खात्यावर

APMC Election : आमदारकीच्या इच्छुकांची बाजार समितीत कसोटी

Soybean Crop Damage : अतिवृष्टीमुळे काढणी केलेल सोयाबीन पाण्यात

Rural Development : गट-तट विसरून गावे आदर्श करा

SCROLL FOR NEXT