Gram Panchayat Election Agrowon
ॲग्रो विशेष

Gram Panchayat Election : जुन्नरला २६ गावांच्या सरपंच पदासाठी १२६ अर्ज

Local Body Election : जुन्नर तालुक्यातील निवडणूक होत असलेल्या २६ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच पदासाठी एकूण ११८ उमेदवारांनी १२६ अर्ज दाखल केले.

गणेश कोरे

Pune News : जुन्नर तालुक्यातील निवडणूक होत असलेल्या २६ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच पदासाठी एकूण ११८ उमेदवारांनी १२६ अर्ज दाखल केले. सर्वाधिक अर्ज बेल्हे ग्रामपंचायतीसाठी ९, तर आदिवासी भागातील निमगिरी व खटकाळेसाठी प्रत्येकी ८, तर कांदळी व सांगणोरेसाठी प्रत्येकी ७ अर्ज दाखल झाले आहेत.

सदस्यपदासाठी ७११ उमेदवारांनी ७२१अर्ज दाखल केले आहेत. इच्छुकांनी अर्ज दाखल करण्यासाठी मोठी गर्दी केली होती, अशी माहिती तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी दिली

ग्रामपंचायतनिहाय अनुक्रमे सरपंच व सदस्य पदासाठी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांची संख्या : सांगणोरे ७-१७, आंबेगव्हाण ३-२२, डुंबरवाडी ४-१७ , वडगाव आनंद ३-४३, पिंपळवंडी ६-५६, निमगिरी ८-१४, खटकाळे ८-१६, खामगाव ३-२०, धालेवाडीतर्फे मिन्हेर २-११, राळेगण ३-१७, सुकाळवेढे ३-८, पाडळी ६-४५, बुचकेवाडी ४-२४, पारुंडे ६-३२, कांदळी ७-५१, नारायणगाव ४-६४, शिरोली तर्फे आळे २-२१, गुंजाळवाडी-बेल्हे ४-२५, बांगरवाडी ३-१३, गुळुंचवाडी ३-१२, बेल्हे ९-८२, रानमळावाडी ५-२१, पिंपरीकावळ २-८, उंब्रज नंबर एक ८-३४, पांगरी तर्फे मढ २-२१, तांबेवाडी ३-१७.

उमेदवारी अर्जाची छाननी सोमवारी (ता.२३) सकाळी ११ पासून छाननी संपेपर्यंत होणार आहे. उमेदवारी अर्ज माघारीसाठी बुधवारी (ता.२५) दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत असून नंतर निवडणूक चिन्ह तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. मतदान रविवारी (ता. ५ नोव्हेंबर) सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत तर मतमोजणी व निकाल सोमवारी (ता.६ नोव्हेंबर) जाहीर केला जाईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Beekeeping Subsidy Scheme: शेतकऱ्यांना मधमाशीपालनासाठी मिळणार ४५ लाखांपर्यंत निधी; जाणून घ्या राष्ट्रीय मधुमक्षिकापालन व मध अभियानाची सविस्तर माहिती

Village Adoption Campaign: जालन्यात गाव दत्तक अभियान

Farmer Support: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचा पुढाकार; एक दिवसाचे वेतन देणार

Linseed Cultivation Practices: रब्बी हंगामासाठी जवस लागवड तंत्र

Irrigation Checking: सिंचन सुरु करण्यापूर्वी तपासा ५ गोष्टी, अशी करा तपासणी

SCROLL FOR NEXT