Fertilizer Use Agrowon
ॲग्रो विशेष

Fertilizer Use : यंदा रासायनिक खतांचा सरासरीच्या १०८ टक्‍के वापर

Chemical Fertilizer : राज्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी केल्यास त्यापोटी खर्च होणारा ५० टक्‍के निधी कृषी विकासासाठी देण्यात येईल. त्यासाठी ‘नमो प्रणाम योजना’ जाहीर करण्यात आली आहे.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : राज्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी केल्यास त्यापोटी खर्च होणारा ५० टक्‍के निधी कृषी विकासासाठी देण्यात येईल. त्यासाठी ‘नमो प्रणाम योजना’ जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रात देखील या योजनेची अंमलबजावणी होईल. त्या अंतर्गत तीन वर्षांत तीन टक्‍के खत वापर कमी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्यात यंदा सरासरीच्या १०८ टक्के खतांचा वापर झाला आहे.

निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक विकास पाटील यांनी याबाबत ‘ॲग्रोवन’ला माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘राज्यात खरीप हंगामात ४१ लाख, तर रब्बी हंगामात २० लाख टन खतांचा वापर आहे. यंदा खरिपात यात वाढ होत हे प्रमाण १०८ टक्क्यांवर पोहोचले. रासायनिक खतांचा अतिवापर होत असल्याची बाब केंद्र सरकारने गांभीर्याने घेतली आहे.

याचा जमिनीच्या आरोग्यावरही परिणाम होतो. तसेच परकीय चलनही खर्च करावे लागते. त्यामुळे देशात खतांचा वापर कमी करण्यास ‘नमो प्रणाम योजने’तून प्रोत्साहन दिले जाईल. यातून वाचलेल्या एकूण निधीपैकी ५० टक्‍के निधी संबंधित राज्यातील कृषी विकासाला मिळेल.

महाराष्ट्रात प्रॉम, ऑर्गेनिक मॅन्युअर व इतर बाबींच्या वापराला पर्याय म्हणून मान्यता देण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या प्रसारासाठी प्रत्येक जिल्ह्यात कार्यशाळा घेत आराखडा तयार केला जाईल. रासायनिक खते किंवा कमी निविष्ठा वापरात अधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या यशोगाथा सादर केल्या जातील.

कृषी विद्यापीठ तज्ज्ञांचे देखील यात सक्रिय सहभाग राहील. तीन वर्षांत ११ लाख, तर या वर्षी २ लाख ४० हजार माती नमुने तपासणीचे उद्दिष्ट आहे. या सर्व बाबींची खास ॲपवर नोंद होऊन त्याआधारे जमीन आरोग्य नकाशा तयार होईल.

१५ जिल्ह्यांत सर्वाधिक वापर

‘‘जळगाव, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, पुणे, जालना, बुलडाणा, नाशिकसह राज्यातील १५ जिल्ह्यांत सर्वाधिक रासायनिक खतांचा वापर होतो,’’ अशी माहिती विकास पाटील यांनी दिली.

देशात यंदा सर्वाधिक १०८ टक्‍के रासायनिक खतांचा वापर महाराष्ट्रात झाला आहे. हा वापर कमी करण्याचे केंद्र सरकारचे नियोजन आहे. त्यानुसार खत नियोजनबद्धरीत्या पिकाला मिळावे, याकरिता विद्राव्य खतांच्या वापरावर दिला जाईल. त्यासाठी ड्रीप वापर वाढावा म्हणून प्रोत्साहन दिले जाईल.
- विकास पाटील, निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक, आयुक्‍तालय, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Update: महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता

Sugarcane Crushing Season: कारखाने १५ ऑक्टोबरला सुरू केल्यास बंद पाडू : शेट्टी

Maharashtra Temperature Rise: ढग हटताच वाढले तापमान

Drought Relief: एनडीआरएफ’पूर्वी राज्याची मदत दुष्काळग्रस्तांना देणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Women Farmer Certificate: कृषी कर्ज मिळणार; महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन पोर्टल सुरु, कसा अर्ज करावा?

SCROLL FOR NEXT