Aslam Abdul Shanedivan
शेतातील उत्पादन वाढविण्यासाठी बळीराजाचा कल सध्या रासायनिक खतांचा वापराकडे दिसत आहे. पण ही खते महाग असल्याने अनेक शेतकऱ्यांना ते शक्य होत नाही.
शेतकऱ्यांना रासायनिक खते ही अनुदानावर भेटणार आहेत. तिही कमी किमतीत. केंद्र सरकारने खरीप हंगामासाठी ३८००० कोटिंची तरतूद केली आहे. हे अनुदान नत्र, स्फुरद आणि पालाश या खतांसाठी आहे.
रासायनिक खते ही महाग असणाचे प्रमुख कारण म्हणजे त्याला लागणारा कच्चा माल. जो विदेशातून मागवला जातो. त्यामुळेच याचा परिणाम थेट खतांच्या किमतीवर होतो.
गेल्या वर्षी भडकलेल्या रशिया युक्रेन युद्धाचा परिणाम रासायनिक खतांच्या किमती दिसून आला होता. युद्धामुळे कच्च्या मालाचे भाव प्रचंड वाढले होते. त्यामुळे रासायनिक खतांची किंमत वाढल्या होत्या.
गेल्या वर्षी खतांच्या किंमती वाढल्याने त्याचा परिणाम हा उत्पादनावर झाला होता. त्यामुळे यावर्षी यंदा शासनाद्वारे रासायनिक खतासाठी अनुदान देण्यात येणार आहे. याबाबत केंद्र सरकारने घोषणा केली आहे.
रासायनिक खतासाठी अनुदान देण्याची घोषणा केंद्र सरकारने केलीय. त्यामुळे याचा राज्यस्तरावर देखील निर्णय घेण्यात येणार आहे. ज्यामुळे शेतकऱ्यांना अनुदानावर रासायनिक खते मिळणार आहेत.
रशिया युक्रेन युद्ध शिथिल झाल्यामुळे कच्च्या मालाचे भाव सध्या स्थिर आहेत. ज्यामुळे अनुदान देण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.