Cotton Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Purchase Rate : परभणीत कापूस खरेदी दरात १००० ते १२०० रुपयांनी सुधारणा

Cotton Rate : परभणी जिल्ह्यातील कापसाच्या प्रमुख बाजारपेठांतील कापूस खरेदीच्या दरात गेल्या काही दिवसात १००० ते १२०० रुपयांनी सुधारणा झाली आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी जिल्ह्यातील कापसाच्या प्रमुख बाजारपेठांतील कापूस खरेदीच्या दरात गेल्या काही दिवसात १००० ते १२०० रुपयांनी सुधारणा झाली आहे. सेलू बाजार समितीत बुधवारी (ता. २८) कापसाची सुमारे २२०० क्विंटल आवक होती. दर प्रतिक्विंटल किमान ६५०० ते कमाल ८०८० रुपये तर सरासरी ७२९० रुपये मिळाले.

सेलू बाजार समितीत (Sailu Bazar Samiti) बुधवारी (ता. २८) पावसात भिजलेल्या कापसाला प्रतिक्विंटल किमान ६५०० ते कमाल ७७०० रुपये दर मिळाले. न भिजलेल्या कापसाला प्रतिक्विंटल किमान ७९०० ते कमाल ८०८० रुपये तर सरासरी ८०४० रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. २७) कापसाची ३५०० क्विंटल आवक झाली. भिजलेल्या कापसाला प्रतिक्विंटल किमान ६७५५ ते कमाल ७२५० रुपये दर मिळाले.

न भिजलेल्या कापसाला (Cotton) प्रतिक्विंटल किमान ७४०५ ते कमाल ७६७० रुपये तर सरासरी ७५८० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. २१) कापसाला प्रतिक्विंटल किमान ५७०० ते कमाल ७४०५ रुपये दर मिळाले. मानवत बाजार समितीमध्ये शनिवारी (ता. २४) कापसाची ३३०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ६७०० ते कमाल ७५५० रुपये तर सरासरी ७४३० रुपये दर मिळाले

शुक्रवारी (ता. २३) कापसाची ३६५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७००० ते कमाल ७४७५ रुपये तर सरासरी ७४०० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. २२) ३६०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ६८५० ते कमाल ७४२५ रुपये तर सरासरी ७३५० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. २१) २९५० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान ६६०० ते कमाल ७४०५ रुपये तर सरासरी ७३२५ रुपये दर मिळाले.

परभणी बाजार समितीत (Parbhani Bazar Samiti) शुक्रवारी (ता. २३) कापसाची २१५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७००० ते कमाल ७४८५ रुपये तर सरासरी ७३५० रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता. २२) १५० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ७१०० ते कमाल ७३६५ रुपये तर सरासरी ७२०० रुपये दर मिळाले.

शेतकऱ्यांना दरवाढीचा फायदा

नोव्हेंबरमध्ये झालेल्या मॉन्सून्नोत्तर पावसात (Rain) वेचणीस आलेला कापूस भिजला. भिजलेल्या कापसाची रेनटच अशी प्रतवारी करून खरेदी केली जात आहे. रेनटच कापसाला साडेपाच हजार रुपयांहून कमी दर मिळाले. दर कमी झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी (Farmers) कापसाची विक्री केली. परंतु आजवर कापूस विक्री (Cotton Sale) न केलेल्या शेतकऱ्यांना दरवाढीचा फायदा होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT