Honey Village Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Honey Village Scheme : मधाचे गाव तयार करण्यासाठी दहा लाख रुपये मदत

Nagar Zilla Parishad : जिल्हा परिषदेने सादर केलेल्या ५० कोटींच्या अंदाजपत्रकात मधाचे गाव तयार करण्यासाठी दहा लाखांची तरतूद करण्यात आली आहे.

Team Agrowon

Nagar News : जिल्हा परिषदेने सादर केलेल्या ५० कोटींच्या अंदाजपत्रकात मधाचे गाव तयार करण्यासाठी दहा लाखांची तरतूद करण्यात आली आहे. अकोल्यासारख्या आदिवासी तालुक्यात मधाचे गाव ही योजना राबविली जाणार आहे. खादीग्रामोद्योगचे यासाठी सहकार्य लाभेल. रायगड, महाबळेश्‍वर येथे ही संकल्पना राबविली आहे. त्या धर्तीवर नगर जिल्ह्यात योजना राबवली जाईल.

जिल्हा परिषदेने २०२४-२५ वर्षाचे अंदाजपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर आणि अधिकाऱ्यांनी सादर केले. या वेळीच्या अंदाजपत्रकात जिल्हा परिषदेने नवनव्या योजनांसाठी निधीची तरतूद केली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ओपन सायन्स पार्क उभारले जाईल. त्यासाठी तब्बल ५० लाखांची तरतूद केली आहे.

सार्वजनिक बांधकाम विभाग व पाणी पुरवठा विभागाचा निधी शिक्षण विभागाकडे वळविला आहे. त्यातूनच या अभिनव योजनांना गती दिली जाणार आहे. गेल्या काही वर्षांपासून इस्रो सहलीला कात्री लावली होती. तीही मिशन स्पार्क या नावाने पुन्हा आणली आहे. तिसरी व चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी पुस्तिका छापली जाणार आहे.

गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी बक्षीस वितरण केले जाईल. त्यांच्यासाठी ऑनलाइन तासिका घेतल्या जातील. पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या शुल्कासाठी भरीव तरतूद केली आहे. गायी-म्हशींच्या पोटातील लोहजन्य वस्तूंपासून प्रतिबंध व उपायासाठी साहित्य व उपकरणे पुरविली जाणार आहेत.

चाऱ्यातून त्यांच्या पोटात खिळे, तसेच तारा जातात. त्यापासून संरक्षण व्हावे यासाठी एक मॅग्नेट पोटात सोडले जाणार आहे. लाडाची लेक योजनेसाठी ५ लाख, रस्ते व दळण वळणासाठी ४ कोटी ६० लाख, जलसंधारण देखभाल, दुरुस्तीसाठी १ कोटीची तरतूद आहे.

वैयक्तिक लाभाच्या योजना

कडबाकुट्टी पुरविणे १०० लाख

पाचवी ते दहावीपर्यंतच्या मुलींना सायकल पुरविणे ७५ लाख (१२५० लाभार्थी)

मागासवर्गीय व्यक्तींना पिठाची गिरणी ६५ लाख (५०० लाभार्थी)

दिव्यांगासाठी घरकुल अर्थसाह्य ४८ लाख (४० लाभार्थी)

शिलाई मशिन पुरविणे ४५ लाख (७५० लाभार्थी)

ग्रामीण महिला-मुलींना प्रशिक्षण ३५ लाख

पशुपालकांना दूधकाढणी यंत्र अनुदान २० लाख (१३३ लाभार्थी)

मुक्तसंचार गोठ्यासाठी अनुदान १५ लाख (७५ लाभार्थी)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT