Sugarcane Seasoon Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Crushing Season : नांदेड विभागातील दहा कारखान्यांचा पट्टा पडला

Sugarcane Season 2025 : प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड विभागातील नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यांतील गाळप हंगाम २०२४-२५ साठी २९ कारखान्यांनी गाळप सुरू केले.

Team Agrowon

Nanded News : प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड कार्यालयांतर्गत नांदेड विभागातील १० साखर कारखान्यांचा पट्टा पडला आहे. विभागात आजपर्यंत या कारखान्यांनी ९४ लाख ११ हजार ३५८ टन उसाचे गाळप, तर ९० लाख आठ हजार ८५३ क्विंटल साखरेचे उत्पादन केल्याची माहिती प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयाने दिली.

प्रादेशिक सहसंचालक (साखर) नांदेड विभागातील नांदेडसह परभणी, हिंगोली व लातूर या चार जिल्ह्यांतील गाळप हंगाम २०२४-२५ साठी २९ कारखान्यांनी गाळप सुरू केले. यात १९ खासगी, तर १० सहकारी साखर करण्यांचा समावेश होता. यंदा हंगामाची सुरुवात १५ नोव्हेंबरपासून झाली. यंदा विभागातील २९ कारखाने सुरू झाली होती.

यात परभणी जिल्ह्यात सात खासगी, हिंगोली जिल्ह्यात दोन खासगी व तीन सहकारी, नांदेड जिल्ह्यात पाच खासगी व एक सहकारी, तसेच लातूरजिल्ह्यातील पाच खासगी व सहा सहकारी कारखान्यांचा समावेश आहे. सध्या उन्हाचा चटका जाणवत आहे. तसा कारखान्यांचे गाळपही कमी होत आहे. यामुळे विभागाचा गाळप हंगाम आटोपतीकडे चालला आहे.

२ मार्चपर्यंत नांदेड विभागातील दहा कारखान्यांचा पट्टा पडला आहे. आजपर्यंत या कारखान्यांनी ९४ लाख ११ हजार ३५८ टन उसाचे गाळप, तर ९० लाख ८ हजार ८५३ क्विंटल साखरेचे उत्पादन केल्याची माहिती साखर सहसंचालक कार्यालयाकडून मिळाली. विभागाचा सरासरी साखर उतारा ९.५७ टक्के असल्याची माहिती मिळाली.

दहा साखर कारखाने बंद

नांदेड विभागातील बंद झालेल्या दहा कारखान्यात लातूर जिल्ह्यातील विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखाना, लातूर, शेतकरी सहकारी साखर कारखाना किल्लारी, ओकांर साखर कारखाना प्रा.लि., विलास सहकारी साखर कारखाना लि. निवळी, संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखाना बेलकूड, रेणा सहकारी साखर कारखाना निवाडा, साईबाबा शुगर्स लि. शिवणी, जागृती शुगर ॲण्ड अलाइड तळेगाव, ट्वेंटीवन शुगर ॲण्ड अलाइड माळवटी तर परभणी जिल्ह्यातील श्री रेणुका शुगर लि. देवनांद्रा पाथरी या कारखान्यांचा समावेश आहे.

कारखानिहाय ऊस गाळप व साखर उत्पादन (गाळप टनांत साखर उत्पादन क्विंटलमध्ये)

जिल्हा कारखाने ऊस गाळप साखर उत्पादन

नांदेड सहा १८,५७,८३५ १७,६१,०८०

लातूर ११ ३३,७८,०१७ ३१,७२,३१३

परभणी सात २७,७४,७०१ २७,००,१६०

हिंगोली पाच १४,००,८०४ १३,७५,३००

एकूण २९ ९४,११,३५८ ९०,०८,८५३

विभागाचा सरासरी साखर उतारा : ९.५७ टक्के

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT