Hapus Mango Market Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Unique Code : हापूस आंबा युनिक कोडसाठी फेब्रुवारीअखेर एक कोटी टीपीसील

Mango Season : आंबा बागायतदारांच्या २ जानेवारीला झालेल्या बैठकीत देवगड हापूसच्या नावावर होणारी बोगस आंबा विक्रीवर निर्बंध घालण्याच्या पर्यायावर चर्चा झाली होती.

Team Agrowon

Sindhudurg News : देवगड हापूस आंब्याच्या नावावर होणारी बोगस आंबा विक्री रोखण्यासाठी युनिक कोडचा निर्णय घेतला असून या कोडसाठी आवश्यक १ कोटी छेडछाड प्रतिबंधक सील (टेंपर प्रिव्हेंटिव्ह सील) फेब्रुवारीअखेरपर्यंत प्राप्त होणार असल्याची माहीती देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष ॲड. अजित गोगटे यांनी दिली.

आंबा बागायतदारांच्या २ जानेवारीला झालेल्या बैठकीत देवगड हापूसच्या नावावर होणारी बोगस आंबा विक्रीवर निर्बंध घालण्याच्या पर्यायावर चर्चा झाली होती. या चर्चेअंती देवगड हापूसची विक्री युनिक कोडच्या माध्यमातून करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

या निर्णयाची अमंलबजावणी आणि आगामी धोरण ठरविण्यासाठी शनिवारी (ता. १८) देवगड तालुक्यातील बागायतदारांची पुन्हा बैठक झाली. या बैठकीला ॲड. ओमकार सप्रे, विद्याधर जोशी, महेश गोखले, चंदू वेळणकर, संजय वेळणकर, विजय फोंडकर, सुधीर जोशी, प्रकाश डामरी, सचिन देवधर, दिलीप केळकर आदी उपस्थित होते.

श्री. गोगटे म्हणाले, ‘‘देवगड तालुक्यात सुमारे ५ हजार आंबा उत्पादक शेतकरी आहेत. गेल्या सहा वर्षांत ५०० शेतकऱ्यांनी ‘जीआय’ (भौगोलिक मानांकन) नोंदणी केलेली आहे. १० वर्षांच्या नोंदणीकरिता केवळ २ हजार १० रुपये शुल्क आहे.

तरीदेखील येथील शेतकरी ‘जीआय’बाबत उदासीन आहेत. जीआय कायद्यानुसार हापूस नावाने आंबा विक्री करणाऱ्या प्रत्येकाकडे जीआय नोंदणी बंधनकारक आहे. देवगड हापूस आंब्याच्या नावावर गेल्या काही वर्षांत बोगस आंबा विक्री होत आहे. त्यामुळे नावलौकीक असलेला आंबा बदनाम होतो.

म्हणून युनिक कोडचा सक्षम पर्याय निवडला आहे. फेब्रुवारी अखेरपर्यंत १ कोटी आंबा फळांसाठी टीपीसील संस्थेकडे प्राप्त होणार आहेत. त्यामुळे युनिक कोड नोंदणी शेतकऱ्यांनी ३१ जानेवारीपर्यत करावी.’’ कोडचा बोगस वापर होऊ नये म्हणून शेतकऱ्यांच्या सात-बारावरील झाडांची नोंद तपासली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rainfall Update: जुलै महिन्यात ३८ मंडलांत कमी पाऊस

Rural Development: सोसायट्या गावाच्या विकासाचे केंद्र बनाव्यात : मंत्री बाबासाहेब पाटील

Jeevamrut Initiatives: एकाच दिवसात ५०० लिटर जिवामृत निर्मितीचा उपक्रम

Crop Damage Compensation: काजू, आंबा उत्पादक नुकसान भरपाईपासून वंचित, पंचनाम्यांतील तांत्रिक अडचणी दूर करण्याची मागणी

Crop Insurance Scheme: बीडमध्ये २.३१ लाख शेतकऱ्यांचे पीकविमा संरक्षण

SCROLL FOR NEXT