संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
बाजारभाव बातम्या

घोडेगाव उपबाजारात नव्या कांद्याला ११ हजार रुपये दर

टीम अॅग्रोवन

सोनई, जि. नगर  : नेवासे बाजार समितीच्या घोडेगाव उपबाजारात शनिवारी (ता. १४) नवीन लाल कांद्याची १५,२०० गोण्या आवक झाली. या लिलावात जुन्या गावरान कांद्याची एकही गोणी आवक झाली नाही. नवीन एक नंबर कांद्यास कमाल ११ हजार रुपये क्विंटल दर मिळाला. या उपबाजारात नव्या लाल कांद्यास २०० ते ११ हजार रुपये क्विंटल असा दर होता. शनिवारच्या लिलावातून तीन कोटी ६८ लाखांची उलाढाल झाल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. 

शनिवारी सकाळी बारा वाजता बाजारात लिलाव सुरू झाला. व्यापारी व अडतदार जुन्या गावरान कांद्याच्या प्रतीक्षेत होते. मात्र, कुणाकडेच तो शिल्लक राहिला नसल्याने शनिवारी प्रथमच जुन्या गावरान कांद्याची एकही गोणी लिलावात पाहण्यास मिळाली नाही. नवीन एक नंबर लाल कांद्यास कमाल ११ हजार रुपये क्विंटल भाव मिळाला. दोन नंबरला ४५०० ते ५५०० रुपये तर तीन नंबरच्या कांद्यास १५०० ते २००० हजार रुपये क्विंटल असा दर मिळाला.

मागील एक महिन्यात येथील कांदा लिलावातून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळाल्याने शनिवारी जिल्ह्याबाहेरून येथे कांदा आला होता. आमदार शंकरराव गडाख यांची नेहमी शेतकरीहिताची भूमिका असल्यानेच येथील जनावरांचा बाजार व आता कांदा लिलाव राज्यात नावारूपास येत आहे. येथील लिलाव पद्धत अनेक बाजार समित्यांमध्ये सुरू होत असल्याचे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Export : कांदा निर्यात खुली; मात्र अटी, शर्थींचा खोडा

Baramati Lok Sabha Election : नणंद की भावजय, कोण मारणार बाजी

Water Scarcity : नागरिकांची पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती

Sugar Industry : साखर उद्योग सौरऊर्जा निर्मितीत येणार

Summer Sowing : उन्हाळी पेरणी क्षेत्रात नऊ हजार हेक्टरने घट

SCROLL FOR NEXT