लाल कांद्याच्या दरात सुधारणा 
लाल कांद्याच्या दरात सुधारणा  
बाजारभाव बातम्या

लाल कांद्याच्या दरात सुधारणा 

टीम अॅग्रोवन

नाशिक  : दरवर्षीच्या प्रमाणे लाल कांद्याची होत असणारी बाजार समित्यांमधील आवक अजूनही मागणीच्या तुलनेत नाही. अजूनही ही आवक कमी आहे. त्यामुळे दर दहा हजारच्या वर गेले होते. कांदा आयात, कांद्यातील ओलावा व प्रतवारीचे कारण पुढे मात्र, चालू सप्ताहाच्या सुरुवातीस हे दर चार हजारांपर्यंत गडगडले होते. मात्र पुन्हा आवकेची स्थिती जेमतेम असल्याने दरात पुन्हा वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. सप्ताहाखेर सर्वसाधारण दरात २५०० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दरात सुधारणा झाली आहे.  सप्ताहाच्या सुरुवातीला लासलगाव बाजार समितीत प्रतिक्विंटल ४७०० दर होता, तर  सप्ताहअखेर शुक्रवार (ता. १३) पर्यंत दरात पुन्हा सुधारणा झाल्याचे पाहायला मिळाले. शनिवार (ता. १४) लाल कांद्याला सर्वसाधारण प्रतिक्विंटल दर मनमाड ६२००, नामपूर ७५००, पिंपळगाव बसवंत ७२०१, असे दर मिळाले. तर लासलगाव, उमराणे बाजार समितीचे कामकाज बंद होते. नवीन खरीप कांदा उशिराने लागवडी झाल्याने बाजारात येणारा कांद्याची आवक अजूनही कमीच आहे. दैनंदिन होणारा पुरवठा करताना व्यापारी वर्गाची अडचण होत आहे. त्यात साठवणुकीची अडचण असल्याने मालाची निकासी वेळेवर करावी लागत आहे. त्यामुळे बाजारभाव पुन्हा उसळल्याचे बाजारात चित्र आहे.

कांदा दरातील सुधारणा (दर सरासरी) 

बाजार समिती   ९ डिसेंबर    १३ डिसेंबर   दरात वाढ 
लासलगाव ४७०० ७३०० २५००
पिंपळगाव बसवंत ५२५१ ७१५१ १९००
उमराणे ५०५० ७००० १९५०
मनमाड ४३५० ६२०० १८५०
देवळा ३५००     ५५००     २०००

नाशिकच्या कांद्याबरोबर राजस्थान व गुजरात  राज्यातून देशभरात होणारा पुरवठा मंदावला आहे. त्याचा परिणाम म्हणून दरात वाढ झाली. - मनोज जैन, कांदा व्यापारी, लासलगाव, ता. निफाड

शेतकऱ्यांकडून आणलेला माल कमी येत आहे. एकरी उत्पादन कमी आहे. त्यात आवक व गुणवत्ता नसल्याने दरात पुन्हा वाढ झाल्याचे दिसून येत आहे.  - सुनील ठक्कर, कांदा व्यापारी, पिंपळगाव बसवंत, ता. निफाड  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Rate : वाढत्या उन्हामुळे साखरेला मागणी, दरातही वाढ

Food Security Scheme : अन्नसुरक्षा योजनेत पुरवल्या अप्रमाणित निविष्ठा

Jowar Market : पंचवीस हजार क्विंटल ज्वारीची कमी दराने विक्री

Heat Wave Maharashtra : उन्हाच्या चटक्याने राज्य होरपळले

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

SCROLL FOR NEXT