मंगळवेढा बाजार समितीत वांग्याला राज्यात सर्वाधिक दर
मंगळवेढा बाजार समितीत वांग्याला राज्यात सर्वाधिक दर  
बाजारभाव बातम्या

मंगळवेढा बाजार समितीत वांग्याला राज्यात सर्वाधिक दर

टीम अॅग्रोवन

मंगळवेढा जि. सोलापूर : मंगळवेढा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २०) झालेल्या लिलावामध्ये देशी वांग्याला तब्बल सहा हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल इतका राज्यात सर्वाधिक दर मिळाला.  या लिलावानंतर फटाके उडवून वांगी खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांचे व शेतकऱ्यांचे बाजार समितीने अभिनंदन केले. या वेळी बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, संचालक सिद्धेश्‍वर आवताडे, सत्यजित सुरवसे, मोहन कोंडुभैरी, अजीम शेख, पांडुरंग मेटकरी, अडत मालक अविनाश चेळेकर, अनिल बोदाडे आदी उपस्थित होते.  राज्यात मोठ्या बाजार समितीत जाणारी वांग्यांची आवक मंगळवेढा बाजार समितीमध्ये होऊ लागली आहे. येथील बाजार समितीमधून व्यापारी वांगी खरेदी करून थेट मुंबई, चडचण, विजयपूर, जत येथे पाठवत असल्याने वांग्याला चांगला दर मिळत आहे. गुरुवारच्या लिलावामध्ये सत्यवान रामा शिंदे (रा. डोंगरगाव, ता. मंगळवेढा) या शेतकऱ्याने आपली वांगी बाजार समितीमध्ये आणली होती. वसंत रामचंद्र चेळेकर यांच्या अडत दुकानात शिंदे यांच्या मालाचा सौदा झाला. यात शिंदे यांच्या वांग्याला प्रतिक्विंटल सहा हजार ५०० रुपये दर मिळाला. गुरुवारी झालेल्या लिलावाचे राज्यातील दरपत्रक पाहिले असता, मंगळवेढा बाजार समितीचा हा दर सर्वाधिक आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Rain : वादळी पावसाने टोमॅटो, मिरची, भेंडीसह ऊस पीक उद्धवस्त, नुकसान भरपाई मिळणार कधी?

Konkan Ranmeva : कोकणच्या रानमेव्यावर वातावरणाचा परिणाम, अनेकांचे आर्थिक गणित कोलमडणार

Agrowon Podcast : हळदीचे भाव तेजीतच; कापूस, सोयाबीन, गहू, लिंबू यांचे काय आहेत दर पाहुयात?

Ethanol Production : कांदा उत्पादकांच्या पाठोपाठ ऊस उत्पादकांनाही सरकारनं घोषणा करून भूलवलं ? | शेतीच्या बातम्या

Maharashtra Rain : राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा; देशातील अनेक भागात तापमानाचा पारा ४२ ते ४६ अंशाच्या दरम्यान

SCROLL FOR NEXT