सातारा : टोमॅटो, ढोबळी, घेवड्याच्या आवकेत वाढ 
सातारा : टोमॅटो, ढोबळी, घेवड्याच्या आवकेत वाढ  
बाजारभाव बातम्या

सातारा : टोमॅटो, ढोबळी, घेवड्याच्या आवकेत वाढ 

टीम अॅग्रोवन

सातारा : जुलै महिन्यात झालेली अतिवृष्टी, सध्या पावसाने मारलेल्या दडीमुळे पिके करपू लागली आहेत. हे कमी म्हणून काय भाजीपाल्यांची आवक वाढल्याने दरात मोठी घसरण झाली आहे. एक पाठोपाठ एक संकटामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. टोमॅटो, ढोबळी, घेवड्याचे दर निम्यावर आले आहेत.  जिल्ह्यातील शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका कायम आहे. अतिवृष्टी, नद्यांना आलेला पूर व सध्या पाण्याअभावी पिके करपण्याचा धोका निर्माण झालेला आहे. या संकटात भाजीपाल्याच्या दरातील होत असलेली घसरणीचा भर पडली आहे. बाजार समितीत टोमॅटोस दर मागच्या सप्ताहाच्या तुलनेत निम्यापेक्षा अधिक कमी झाले आहेत. सध्या टोमॅटोस दहा किलोस ४० ते ६० रुपये दर मिळत आहे. ढोबळी मिरची, काळा, वाल घेवड्याचीही आवक तशीच आहे. ढोबळीस दहा किलोला १५० ते २५० मिळणारा दर आता ८० ते १०० रुपयावर आला आहे. वाल घेवडा ३०० ते ४०० वरून ८० ते १०० तर काळा घेवडा ५०० ते ६०० वरून २०० ते २५० रुपयांवर आला आहे. भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने दरात घसरण सुरू असल्याचे व्यापारी सांगत आहे. लॅाकडाउन नसला तरी अपेक्षित भाजीपाला मागणी होत नसल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगितले जात आहे. 

प्रतिक्रिया माझी दोन एकर ढोबळी मिरची सुरू आहे. मागील महिन्यात दराची स्थिती बरी होती. आता मात्र दहा किलोला ८० ते १०० रुपये दर मिळत आहे. तोडणी, वाहतूक खर्च बघितला तर तोडणी करण्याची इच्छाच होत नाही.  सुभाषराव जाधव, प्रगतशील शेतकरी, काशीळ, ता. जि. सातारा. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : एप्रिलमध्ये पिकांचे २७ कोटींचे नुकसान

Agriculture Irrigation : आक्रोश मोर्चाचे रूपांतर उपोषणात

Cotton Cultivation : सरासरीच्या तुलनेत यंदा कपाशीची लागवड वाढणार

Book Review : ऋग्वेदाच्या पौराणिक अन् वैज्ञानिक स्पष्टीकरणाचा प्रयत्न

Drought Monitoring : दुष्काळ पाहणी पथकांचा सोपस्कार

SCROLL FOR NEXT