कोथिंबीरीची झालेली आवक
कोथिंबीरीची झालेली आवक 
बाजारभाव बातम्या

जळगाव येथे कोथिंबीर १८०० ते ३००० रुपये क्विंटल

Chandrakant Jadhav

जळगाव : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील घाऊक बाजारपेठेत शुक्रवारी (ता. २२) कोथिंबिरीला कमाल ३००० रुपये क्विंटलपर्यंत दर मिळाला. कोथिंबिरीचा हा दर या सप्ताहातील सर्वाधिक होता. कोथिंबिरीची चार क्विंटल आवक झाली. कोथिंबिरीला १८०० ते ३०००, तर सरासरी २२०० रुपये क्विंटल दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

सध्या गिलके, कारले, गवार, वांगी, पालक, भेंडी या भाज्यांची आवक कमी होती. बाजार समितीमध्ये कोथिंबिरीची आवक जळगाव, भुसावळ, जामनेर, सिल्लोड, धरणगाव, एरंडोल, भडगाव परिसरांतून होत असते. लसणाचे दरही बऱ्यापैकी असून, त्याची आवक मध्य प्रदेश, छत्तीसगड भागांतून होत असल्याचे सांगण्यात आले.

बाजार समितीमध्ये गिलक्‍याची चार क्विंटल आवक झाली. त्यास १००० ते २००० रुपये, तर सरासरी १५०० रुपये क्विंटल दर मिळाला. मिरचीची ४३ क्विंटल आवक झाली. मिरचीला ८०० ते १६०० रुपये, तर सरासरी ७०० रुपये क्विंटल दर मिळाला. लसणाची ७२ क्विंटल आवक झाली. लसणाला २००० ते ४५०० रुपये, तर सरासरी ३००० रुपये क्विंटल दर मिळाला. वांग्यांची ३१ क्विंटल आवक झाली. वांग्याला ९०० ते २१०० रुपये तर सरासरी १४०० रुपये क्विंटल दर होता.

टोमॅटोची ३७ क्विंटल आवक झाली. टोमॅटोला ८०० ते १५०० रुपये, तर सरासरी एक हजार रुपये क्विंटल दर मिळाला. पालकची दोन क्विंटल आवक झाली. त्याला १४०० रुपये क्विंटल दर होता. कांद्याची २०० क्विंटल आवक झाली. कांद्याला ६०० ते १६०० रुपये तर सरासरी ९५० रुपये क्विंटल असा दर होता. फ्लॉवरची पाच क्विंटल आवक झाली. त्यास १२०० ते २२०० रुपये तर सरासरी १७०० रुपये क्विंटल दर मिळाला.

भेंडीची सहा क्विंटल आवक झाली. भेंडीला १८०० ते ३००० रुपये, तर सरासरी २४०० रुपये क्विंटल असा दर होता. बटाट्याची २०० क्विंटल आवक झाली. बटाट्याला ३०० ते ६०० रुपये, तर सरासरी ४०० रुपये क्विंटल दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sadabhau Khot : 'आधी कडकनाथवर बोला', भर सभेत शेतकऱ्यांचा सदाभाऊ खोतांना सवाल

Onion Export Ban : केंद्र सरकारच्या चलाखीमुळे कांदा निर्यातीवरील लगाम कायम; शेतकऱ्यांना कितीपत फायदा होणार?

Kolhapur Water Shortage : गावांना टँकरद्वारे पाण्याची गरज, लोकप्रतिनिधी, प्रशासन निवडणुक कामात व्यस्थ

Agriculture Industry : उद्योगाच्या घरी रिद्धी-सिद्धी...

Success Story : अल्पभूधारकांच्या शेतात फुलली हिरवाई

SCROLL FOR NEXT