नाशिकला टोमॅटोचे दर वधारले
नाशिकला टोमॅटोचे दर वधारले 
बाजारभाव बातम्या

नाशिकला टोमॅटो दरात सुधारणा

ज्ञानेश उगले

नाशिक : मागील महिनाभरापासून टोमॅटोच्या बाजाराची परिस्थिती अडचणीची होती. मात्र, गत सप्ताहापासून टोमॅटोचे दर वधारण्यास सुरवात झाली आहे. नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत बाजार समितीत टोमॅटोची सर्वाधिक आवक होते. गत सप्ताहात या बाजार समितीत सरासरी अडीच लाख क्रेटची झाली. याही स्थितीत प्रति २० किलो वजनाच्या क्रेटला ४० ते २८५ व सरासरी १७० रुपये दर मिळाले. दरात प्रतिक्रेटमागे २० ते ६० रुपयांची ही वाढ टोमॅटो उत्पादकांना काहीसा दिलासा देणारी ठरली.

मागील दोन महिन्यानंतर पहिल्यांदाच टोमॅटोच्या दरात दिलासादायक वाढ झाली. पिंपळगाव बसवंतच्या बाजार आवारात टोमॅटोच्या २ लाखांवर क्रेटची आवक होते. त्यात सातत्याने वाढ होत असतानाही ही दरात वाढ झाल्याने टोमॅटो उत्पादकांना दीर्घ कालावधीनंतर हायसे वाटले.

टोमॅटोचे निर्यातदार व्यापारी राजेश म्हैसधुणे म्हणाले, की आतापर्यंत बंगळूरच्या टोमॅटोच्या मार्केटचा मोठा प्रभाव होता. मात्र, हा हंगाम संपण्याच्या मार्गावर असून त्याच काळात नाशिक भागातील हंगाम वेग घेत आहे. या स्थितीत नाशिक जिल्ह्यातील बाजारात परराज्यातून खरेदीदार व्यापाऱ्यांचे आगमन सुरू झाले आहे.

बाजारात आवक जास्त असली तरी उच्च प्रतीच्या टोमॅटोचा तुटवडा अधिक आहे. नाशिकच्या बहुतांश भागात दुष्काळी स्थिती असल्याने त्याचाही फटका टोमॅटोला बसला आहे. यंदा लागवड मोठ्या प्रमाणावर दिसत असली तरी येत्या काळात टोमॅटोला मागणीही वाढेल अशी स्थिती आहे. ही स्थिती पाहता टोमॅटोचे दर स्थिर राहतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

बंगळूरचा टोमॅटो हंगाम संपला असून नाशिक भागातील हंगामाने वेग धरला आहे. आवक जास्त असली तरी खरेदीदारांना उच्च प्रतीच्या टोमॅटोचा तुटवडा जाणवत आहे. या स्थितीत चांगल्या दर्जाच्या मालाला चांगले दर मिळत आहे. हे दर अजून महिनाभर स्थिर राहतील असा अंदाज आहे. - राजेश म्हैसधुणे, टोमॅटो निर्यातदार, नाशिक.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

Kharif Sowing : साडेसात लाख हेक्टरवर जिल्ह्यात खरिपाचा पेरा

Shaktipeeth mahamarg : 'रस्त्यांवरच्या लढाईची शेतकऱ्यांनी तयारी करावी', शक्तिपीठ विरोधात शेतकऱ्यांची एकजूठ

SCROLL FOR NEXT