टोमॅटो
टोमॅटो 
बाजारभाव बातम्या

नाशिकला टोमॅटोची आवक निम्म्याने घटली

ज्ञानेश उगले

नाशिक : नाशिक जिल्ह्यात ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात टोमॅटोची दररोज ५ लाख क्रेट आवक होत होती. गत सप्ताहात झालेल्या जोरदार पावसाचा तडाखा खुडत्या अवस्थेतील टोमॅटोला बसला. परिणामी पिंपळगाव बसवंत, लासलगाव, वणी, गिरणारे या बाजारपेठांतील आवक निम्म्याने घटली. एकट्या पिंपळगाव बसवंत बाजार समितीतील आवक साडेतीन लाखांवरून अवघी ८१ हजार क्रेटपर्यंत कमी झाली आहे. या वेळी टोमॅटोला प्रति २० किलो वजनाच्या क्रेटला १५१ ते ६०० व सरासरी ४०० रुपये दर मिळाले. गतवर्षी या भागातील टोमॅटोला नोटाबंदीचा फटका बसला होता. यंदा ती कसर अवकाळी पावसाने भरून काढली. या स्थितीत नाशिकच्या टोमॅटो आगारातून होणारी आवक निम्म्याने घटली आहे. मागील सप्ताहात सुरवातीपासून पावसाने शिवारात दररोज हजेरी लावली. नाशिक भागातील टोमॅटो हंगामाने वेग घेतलेला असताना जोरदार पावसाने यात अडथळे आले. बाजार आवारातही पाणी साचले असल्याने त्याचा व्यापाऱ्यांनाही फटका बसला. परिणामी या काळात दरातही २० टक्‍क्‍यांपर्यंत उतरण झाली. बुधवारनंतर पाऊस सुरूच असला, तरी बाजारातील आवक घटली. शनिवारी, रविवारी आवकेत निम्म्यापेक्षा अधिक घट झाली. परिणामी मागणीत वाढ झाली. सरासरी प्रति २० किलोला २२५ असलेले दर ४२५ पर्यंत वधारले. नाशिक भागातील गिरणारे, वणी भागांतील टोमॅटोच्या हंगामाने अद्याप गती घेतलेली नाही. येत्या सप्ताहात ही आवक वाढेल असा अंदाज व्यक्त होत होता. मात्र पावसाने या भागातील टोमॅटोचे मोठे नुकसान केले आहे. ही स्थिती पाहता गुणवत्तापूर्ण टोमॅटो मालाचा तुटवडा निर्माण होऊ शकतो. या स्थितीत टोमॅटोचे सध्याचे दर टिकून राहतील, असे बाजार समितीच्या सूत्रांनी सांगितले. प्रतिक्रिया पावसामुळे टोमॅटो पिकाचे नुकसान झाले आहे. या स्थितीत आवक निम्म्यापेक्षा जास्त प्रमाणात घटली आहे. मागणीची स्थिती पाहता येत्या काळात टोमॅटोचे सध्याचे दर टिकून राहतील, असा अंदाज आहे. - संजय पाटील, सचिव, पिंपळगाव बसवंत बाजार समिती.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Delhi Farmers' protest : भाजपच्या उमेदवारांविरोधात पंजाबमध्ये शेतकऱ्यांचा रोष वाढला; एसकेएमचा विरोध कायम

Lok Sabha Constituency : कोल्हापूर जिल्ह्यातील ३७ लाख ५० हजार मतदारांचा कौल कोणाला? मतदान केंद्रे सज्ज

Fire in Nainital : उत्तराखंडच्या जंगलातील आग पोहचली शेताच्या बांधावर, एका महिलेचा होरपळून मृत्यू

Animal Ear Tagging : ...अन्यथा भरपाई अन् अनुदान नाही

Sunburn Crop : कोवळी रोपे वाचविण्यासाठी शेतकरी सरसावला

SCROLL FOR NEXT