सोयाबीन, अकोला
सोयाबीन, अकोला  
बाजारभाव बातम्या

अकोल्यात सोयाबीन प्रतिक्विंटल २२२५ ते २४३० रुपये

टीम अॅग्रोवन

अकोला : सोयाबीन हंगामाने जोर पकडलेला असून बाजार पेठांमधील आवकही वाढत आहे. अकोला बाजारात मंगळवारी (ता. ७) सोयाबीनची आवक ५१०३ क्विंटल झाली होती. सोयाबीनला २२२५ ते २६३० रुपये प्रतिक्विंल मिळाला. अकोल्यातील बाजारात जिल्ह्यासह लगतच्या वाशीम, बुलडाणा जिल्ह्यातील काही भागांतून शेतमालाची आवक होत असते. या ठिकाणी दरदिवसाला सोयाबीनच्या आवकेत वाढ होत आहे. उडदाला ३८०० ते ४३०० व सरासरी ४०५० रुपये दर मिळाला. मुगाच्या दरात किंचित सुधारणा दिसून येत असून आता ४२०० ते ४९५० रुपये दर मिळाला. ७१५ क्विंटल मूग विक्रीसाठी आला होता. तुरीच्या दरात मात्र अद्यापही तेजी आलेली नाही. अवघे ३६०० पासून तूर विकत आहे. तुरीला जास्तीत जास्त ४०५० चा भाव मिळाला. २६४ क्विंटल तूर विक्री झाली. हरभऱ्याचे दरही स्थिरावले आहेत. ४२०० पासून विक्रीची सुरवात होऊन पाच हजारपर्यंत भाव मिळाला. ६०८ क्विंटल हरभरा विक्रीला आला होता.

खामगावात सोयाबीनची आवक वाढली वऱ्हाडातील प्रमुख बाजारपेठांपैकी एक असलेल्या खामगाव (जि. बुलडाणा) बाजारपेठेत सोयाबीनची आवक दरदिवसाला वाढत चालली आहे. सोमवारी (ता. सहा) या बाजारात १८ हजार २४५ क्विंटल सोयाबीन विक्रीला आले होते. २१०० ते २६५० दरम्यान या सोयाबीनला भाव मिळाला. सोयाबीनचा हंगाम सध्या या भागात जोरावर आहे. काढणी, मळणी सोबतच विक्रीनेही वेग धरला आहे. त्यामुळे दररोज या बाजारात खामगाव तालुक्‍यासह मेहकर, शेगाव, नांदुरा, संग्रामपूर, मोताळा, अशा विविध भागातून शेतमालाची आवक होत आहे. एक दिवस आधी १३ हजार क्विंटल आवक झाली होती. त्यानंतर १८ हजार क्विंटलवर ही आवक पोचली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Animal Care : वाढत्या उष्णतेचा पशुधनास फटका

Public Well Policy : सार्वजनिक विहिरींच्या पुनरुज्जीवनावर धोरण काय?

Agriculture Irrigation : ‘म्हैसाळ’चे पाणी माडग्याळ शिवारात

Jalgaon Lok Sabha : ...तर जळगावचे चार खासदार पोहोचतील लोकसभेत

Banana Orchard Burn : सातपुड्याच्या पायथ्याशी केळी बागा करपल्या

SCROLL FOR NEXT